VIDEO: भंडारदरा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग, शेंडी, रतनवाडी, हरिश्चंद्र गड पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
मागील 10 दिवसांपासून पावसाने भंडारदरा धरण क्षेत्रात जोरदार बँटिंग केल्याने शेंडी, रतनवाडी, हरिश्चंद्र गड या परिसराचे सौंदर्य खुलले आहे. अनेक धबधबे डोंगरकड्यावरून कोसळू लागल्याने भंडारदऱ्यात पर्यटकांची विकेंडला मोठी गर्दी दिसून येतेय.
अहमदनगर : मागील 10 दिवसांपासून पावसाने भंडारदरा धरण क्षेत्रात जोरदार बँटिंग केल्याने शेंडी, रतनवाडी, हरिश्चंद्र गड या परिसराचे सौंदर्य खुलले आहे. अनेक धबधबे डोंगरकड्यावरून कोसळू लागल्याने भंडारदऱ्यात पर्यटकांची विकेंडला मोठी गर्दी दिसून येतेय. धबधब्याखाली ओले चिंब होण्याचा आनंदही पर्यटक लूटतायत.
VIDEO: अहमदनगरमधील पर्यटनस्थळांचं सौंदर्य खुललं, भंडारदरा 85 टक्के भरलं, पर्यटकांची मांदियाळी#Ahmednagar #Akole #WaterFall #Bhandardara #TouristPlaces pic.twitter.com/ojh4MbEXYy
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 1, 2021
भंडारदरा 85 टक्के भरलं, पर्यटकांची मांदियाळी
दाट धुके, डोंगरावरून कोसळणारे धबधबे तर निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू आणि वातावरणातील गारवा अनुभवण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांची मांदियाळी सध्या दिसून येतेय. आषाढ सरींनी जोरदार हजेरी लावल्याने नगर जिल्ह्यातील 11 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भंडारदरा धरण 85 टक्के भरलंय.
“नेकलेस फॉल, न्हानी फॉलसह अंब्रेला फॉल आणि रिव्हर्स फॉलनं डोळ्यांची पारणं फेडली”
VIDEO: भंडारदरा धरण 85 टक्के भरलं, अंब्रेला फॉलनं पर्यटकांच्या डोळ्याची पारणं फेडली@TV9Marathi #Ahmednagar #Akole #WaterFall #UmbrellaWaterFall #Bhandardara #TouristPlaces #अहमदनगर #म pic.twitter.com/2SBkHZsZGZ
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 1, 2021
भंडारदरा धरण परिसरात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. परिसरातील अनेक डोंगर माथ्यावरून पडणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण ठरू लागले आहेत. नेकलेस फॉल, न्हानी फॉलसह पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा अंब्रेला फॉल आणि रिव्हर्स फॉलही डोळ्यांची पारणे फेडत आहे.
विक एंड निर्बंधांमध्ये शिथिलतेची मागणी
वनविभागाच्या क्षेत्रात असलेल्या परिसरात फिरण्यास मात्र शनिवार आणि रविवार बंदी असल्याने अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी तसेच सांम्रद व्हॅलीचा नजारा पाहता येत नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केलीय. यात शिथिलता आणावी अशी मागणी ग्रामस्थ आणि व्यवसायिकांनी केलीय.
हेही वाचा :
VIDEO | अतिवृष्टीमुळे गोव्याच्या दूधसागर धबधब्यावर थांबली रेल्वे, रेल्वे मंत्रालयाने शेअर केला मनमोहक व्हिडिओ
धबधबा पाहायला आलेले बाप-लेक पोहायला उतरले, पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू
आंबोलीत पर्यटकांची गर्दी; पोलिसांकडून अटकाव, पर्यटकांचा हिरमोड, हताश होऊन माघारी!
व्हिडीओ पाहा :
Waterfall in Ahmednagar started after continuous rain in Bhadardara