Weather Forecast : मुंबईतील तापमान कमी होण्यास सुरुवात, पुण्यात कडाक्याची थंडी, नंदुरबारमध्ये पारा 11 अंशावर
वातावरणात झालेला बदल आणि कडाक्याच्या थंडीमुळे मुंबई, पुणे, लोणावळा, नंदुरबार याठिकाणी धुक्याची चादर बघायला मिळते आहे. मुंबईतील तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तर पुण्यामध्ये कडाक्याची थंडी आहे आणि पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर धुक्यामुळे रस्ता हरवला आहे.
मुंबई : वातावरणात झालेला बदल आणि कडाक्याच्या थंडीमुळे मुंबई, पुणे, लोणावळा, नंदुरबार याठिकाणी धुक्याची चादर बघायला मिळते आहे. मुंबईतील तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तर पुण्यामध्ये कडाक्याची थंडी आहे आणि पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर धुक्यामुळे रस्ता हरवला आहे. नंदुरबारमध्ये पारा 11 अंशावर आहे. या थंडगार वातावरणामध्ये नागरिक सकाळी फिरण्याचा आनंद घेत आहेत.
मुंबईमध्ये तापमान कमी होण्यास सुरुवात
मुंबईकरांना सध्या संमिश्र वातावरणाचा अनुभव मिळतो आहे. एकीकडे तापमान 3 अंशाने खाली तर दुसरीकडे धुरकट वातावरण आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्याने राज्यात कडाक्याची थंडी अवतरण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. येत्या चार दिवसांमध्ये रात्रीच्या किमान तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने घट होऊन तापमान सरासरीखाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुण्यात कडाक्याची थंडी
शुक्रवारी कुलाबा येथे 29 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 29.9 अंश सेल्सिअस असे कमाल तापमान नोंदवले गेले आहे. दोन्ही ठिकाणचे तापमान सरासरीच्या तुलनेत 3 अंशांनी कमी होते. कुलाबा येथे 19.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. येथे सरासरीच्या तुलनेत एका अंशाने घट झालेली दिसून आली. सांताक्रूझ येथे 19.6 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. येथे सरासरीच्या तुलनेत 2 अंशांची वाढ झाली. शुक्रवारी हवा गुणवत्ता निर्देशांक कुलाबा येथे 246, माझगाव येथे 358 म्हणजेच ‘अतिवाईट’ श्रेणीत होता.
नंदुरबारमध्ये तापमान 11 अंशावर
पुण्यामध्ये तर कडाक्याची थंडी आहे. वातावरणात झालेला बदल आणि कडाक्याची थंडी यामुळे आज सकाळपासून देहूरोड परिसरात आणि मुंबई कात्रज बायपास परिसरामध्ये धुके आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील तापमानात मोठी घट झाली आहे. धडगाव तालुक्यातील डोंगराळ भागात तापमान 8 अंश सेल्सिअस तर नंदुरबार सह सपाटीच्या भागात तापमान 11 अंशपर्यंत आहे. आठ दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ऑपरेशन ‘ऑल आऊट’; रस्त्यावर उतरत केली वाहनांची तपासणी