Weather Update Today : औरंगाबादला पावसाने झोडपलं, पुण्याला यलो अलर्ट, कोकण ते विदर्भ कुठे कुठे पाऊस?

Weather forecast Today : राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने कालच याबाबतचा इशारा दिला आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार

Weather Update Today : औरंगाबादला पावसाने झोडपलं, पुण्याला यलो अलर्ट, कोकण ते विदर्भ कुठे कुठे पाऊस?
Aurangabad rain
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 9:05 AM

औरंगाबाद : हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. रात्रभर मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्याला झोडपले. पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस बरसला. अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाची जोरदार एन्ट्री झाली आहे.

दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने कालच याबाबतचा इशारा दिला आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, पुण्यातही आगामी तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. दरम्यान पुणे शहर परिसरासाठी आज पावसाचा यलो तर उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाडा विभागात जोरदार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हवामान विभागानं मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याप्रमाणं पावसाच्या सरी कोसळल्यास शेतकऱ्यांची पिक वाचतील, असं हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन ते चार दिवसात असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

17 ऑगस्टला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पाऊस

कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

VIDEO :

संबंधित बातम्या  

Weather Update: राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा नवा अंदाज

Weather Update: मान्सून सक्रिय होतोय; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....