AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meteor Shower or Satellite ? : अकोला, बुलडाणामध्येही रात्री दिसलेले आकाशात आगीचे गोळे, खगोल शास्त्रज्ञ नेमकं काय सांगतात?

अकोल्यात काल सायंकाळी अंधार पडला. आकाश अगदी निरभ्र होता. अशातच अचानक आकाशात उत्तरेकडून दक्षिणकडे जाणारे आगीचे गोळे दिसले. केवळ अकोला शहरातच नव्हे तर जिल्ह्यांमध्येही असाच नजारा पहावयास मिळाल्याची वार्ता पसरली. व्हिडीओ व्हायरल झाला. हा सर्व प्रकार शनिवारी रात्री घडला.

Meteor Shower or Satellite ? : अकोला, बुलडाणामध्येही रात्री दिसलेले आकाशात आगीचे गोळे, खगोल शास्त्रज्ञ नेमकं काय सांगतात?
अकोला जिल्ह्यात अशाप्रकारे आकाशात लाईट चमकत होते. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 3:29 PM

अकोला : जिल्हातल्या अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात (In the camera of the mobile) उल्कापात कैद केला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे. पण नेमकं काय आहे हे समजू शकले नाही. उल्कापातचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हातल्या अनेक भागात अनेकांनी उल्कापात पाहिल्याचा दावा केला आहे. अकोल्यात काल सायंकाळी अंधार पडला. आकाश अगदी निरभ्र होता. अशातच अचानक आकाशात उत्तरेकडून दक्षिणकडे (from north to south) जाणारे आगीचे गोळे दिसले. केवळ अकोला शहरातच नव्हे तर जिल्ह्यांमध्येही असाच नजारा पहावयास मिळाल्याची वार्ता पसरली. व्हिडीओ व्हायरल झाला. हा सर्व प्रकार शनिवारी रात्री घडला. अनेकांनी ही रोषणाई याची देही याची डोळा अनुभवली. आणि या रोषणाईची (lighting) चर्चा संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. परंतु हा उल्कापात की धूमकेतू की कृत्रिम उपग्रहाचे तुकडे की आणखी काही, हे कोडे मात्र उलगडू शकले नाही.

उल्कापाताचे तुकडे असावेत

आकाशात उल्कापिंडसदृश आगीचे गोळे अनेकांनी पाहिले. या गोळ्यांना पुच्छ असल्यामुळे हे बहुधा धूमकेतू असावेत, असेही अनेकांना वाटले. कुणाला तर क्षेपणास्त्र असल्याचीही शंका आली. अगदी काही सेकंदासाठी हे आगीचे गोळे आसमंतात तरंगताना आढळले. हा उल्कापात नसून एखाद्या कृत्रिम उपग्रहाचे तुकडे होऊन ते पृथ्वीच्या कक्षेत आले असावेत, अशी शक्यता खगोल अभ्यासक प्रभाकर दौड यांनी व्यक्त केली आहे. रात्री पावणेआठच्या सुमारास राकेट सदृश पश्चिमेकडून पूर्वेकडं जाताना दिसले. ते एका रॉकेटचे तुकडे असल्याचं सांगण्यात आलंय.

50 फूट आग आणि धूर

काल संध्याकाळी 7.45 मिनिटांनी मोताळा, जळगाव जामोद, बुलडाणा, शेगावकडून अकोटकडे आकाशातून विमान किंवा रॅकेट सारखे वरून जाताना दिसलं. मागे आग लागलेली दिसत होती. तसेच त्यामागे 40 ते 50 फूट आग आणि धूर दिसत होता. अनेकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून व्हायरल केला. मात्र जिल्ह्यात तर्कवितर्क सुरू आहेत. तर काही जण उल्कापिंड असल्याचे ही बोलत आहेत. मात्र याबद्दल अधिकृत काहीच समजू शकले नाही.

Yavatmal NCP | जिल्हाध्यक्ष हटाव, राष्ट्रवादी बचाव; यवतमाळ जिल्ह्यात असंतुष्टांची बॅनरबाजी, बैठक वादळी ठरणार?

Meteor Shower or Satellite ? : वर्धेतही सापडले सिलिंडरच्या आकाराचे अवशेष, पोकळ असलेली वस्तू प्लास्टिकसारखी

Meteor Shower or Satellite ? चंद्रपुरातील पवनपारमध्ये सापडला साडेपाच किलोचा गोळा; प्रशासन करणार तपास

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.