Akola | झोका घेताना झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकला, तरुणीचा जागीच अंत!

ही घटना जेव्हा घडली तेव्हा कल्याणीची आई घराच्या गच्चीवर काम करण्यासाठी गेली होती. तर वडील बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. त्यामुळे जेव्हा दोर कल्याणीच्या गळ्यात अडकला तेव्हा तिला वाचवण्यासाठी कुणीच तेव्हा तिच्यासोबत नव्हतं

Akola | झोका घेताना झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकला, तरुणीचा जागीच अंत!
झोपाळ्याच्या दोऱ्यात अडकून मृत्यू
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 3:15 PM

अकोला : मृत्यू कोणाला कुठे, कसा आणि केव्हा कवटाळेल, याचा काहीही नेम नाही. हेच अधोरेखित करणारी घटना अकोल्यात घडली आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बाळापूर तालुक्यातल्या रिधोरा (Ridhora) गावात राहणाऱ्या एका तरुणीला झोपाळ्याच्या दोरीचा गळफास बसला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणीचं वय अवघं 21 वर्ष होतं. या घटनेनं तरुणीच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.

झोका घेताना मृत्यू ओढावला

कल्याणी दिपक पोटे (Kalyani Deepak Pote) ही 21 वर्षीय तरुणी घरी झोपाळ्यावर झोका घेत होती. कल्याणी ही डी.एडची विद्यार्थ्यानी होती. संध्याकाळच्या सुमारास, पाळण्याच्या दोरीवर ती उशी टाकून बसली होती. अचानक उशी सरल्यानंतर ती खाली कोसळून बेडच्या काठावर उपडीपडली आणि झोपाळ्याचा दोर तिच्या गळ्याभोवती अडकला. यात कल्याणीच्या गळ्याचा जबर मार लागला. काही वेळ ती तशीच पडून होती.

तर कदाचित तिचा जीव वाचला असता

ही घटना जेव्हा घडली तेव्हा कल्याणीची आई घराच्या गच्चीवर काम करण्यासाठी गेली होती. तर वडील बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. त्यामुळे जेव्हा दोर कल्याणीच्या गळ्यात अडकला तेव्हा तिला वाचवण्यासाठी कुणीच तेव्हा तिच्यासोबत नव्हतं. त्यामुळे जेव्हा कल्याणीची आई काम आटोपून घरात आली, तेव्हा त्यांनी जे बघितलं, ते हादरवणारं होतं. कल्याणीच्या आईनं आरडाओरडा केल्यानंतर शेजारील नागरीक जमले आणि त्यांना कल्याणीला लगेचच उपचारासाठी नेलं. पण तिथं डॉक्टरांनी कल्याणीला मृत घोषित केलं. पण जेव्हा कल्याणी झोपाळ्यातील उशी सरकल्यानंतर पडली, तेव्हाच तिला मदत मिळाली असती, तर कदाचित आज ती जिवंत असती.

संपूर्ण गाव शोकसागरात!

ऐन तारुण्यात आपल्या मुलीला गमावल्यानं कल्याणीच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अत्यंत शोकाकूल वातावण्यात कल्याणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण घटनेनं संपूर्ण रिधोरा गाव शोकसागरात बुडालाय.

झोपाल्यावर काळजी घ्या!

अकोल्यातील या घटनेनं झोपाळ्यावर असताना किती सतर्क आणि सजग राहायला हवं, हे अधोरेखित केलंय. थोडासापण हलगर्जीपणा जिवावर बेतू शकतो. त्यामुळे झोपाळ्यावर असताना काळजी घेण्याची गरजही व्यक्त केली जाते आहे. शिवाय एकटं असताना शक्यतो झोपाळ्यावर बसणंही, शक्यतो टाळावं.

 इतर बातम्या – 

कस्टमर केअरला फोन केला, बँकेच्या माहितीची लिंक भरून पाठविली; गमावले साडेचार लाख

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं

एकाचा गळा दाबला, तर दुसऱ्याला भोसकलं! 12 तासांच्या आत दोन राजकीय नेत्यांची हत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.