VIDEO: कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना?; नारायण राणे भडकले

कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना. त्यांचा काय संदर्भ देताय?, असा सवालच नारायण राणे यांनी केला.

VIDEO: कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना?; नारायण राणे भडकले
narayan rane
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 1:43 PM

सिंधुदुर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना. त्यांचा काय संदर्भ देताय?, असा सवालच नारायण राणे यांनी केला.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंवर आरोप करण्यात आला आहे. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विधानभवनाबाहेर नितेश राणे यांनी केलेल्या वर्तनावर प्रश्न विचारण्यात आला. तसेच अजित पवार यांनी आज सभागृहात सदस्यांना समज दिल्याचंही राणेंना सांगण्यात आलं. त्यावर राणे उसळले. माझी मर्यादा काय आहे हे मला माहीत आहे. मी बाकी कोणाची पर्वा करत नाही. कायद्याने वागायचं मला कळतं. माझ्या पदाचा मी दुरुपयोग केला नाही. एवढे वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे. मी अन्याय सहन करणाऱ्यांपैकी नाही. विधान भवनाच्या पायरीवर बोलण्यावर बंधन नाही. तो संसदीय शब्द नाही. कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यांचा काय रेफरन्स देता? असा सवाल राणेंनी केला.

निवडणुकीपर्यंत डांबून ठेवण्याचा डाव

पोलीस एवढे का आले याची माहिती घ्या. एका आमदारासाठी एवढी यंत्रणा लावली आहे. कोकणात काय आतंकवादी आले की पाकिस्तानातून कोणी आलं? साधं एक खरचटलं… मारहाण झाली. मग एवढे पोलीस का? अशा घटना घडत असतात. आमदाराला मारहाण झाली का? की आमदाराने मारहाण केली? नितेश राणेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांचं नाव या प्रकरणात गोवलं जात आहे. निवडणूक संपेपर्यंत त्यांना डांबून ठेवण्याचा डाव आहे. 307 कलम या गुन्ह्यात लावलं आहे. मेंदू, हृदय आणि डोक्याला मार लागला तर हे कलम लावलं जातं. कारण या भागांवर लागलं तर मृत्यू होता. मात्र या प्रकरणात फक्त खरचटलं आहे. तरीही 307 कलम लावलं आहे, असं ते म्हणाले. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दारू पासिंग होते. काय केलं तुम्ही? असा सवालही त्यांनी केला.

एवढं चिडायला काय झालं?

मांजराचा आवाज काढल्याने एवढं चिडायला काय झालं? आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्याव केलं असेल तर आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का? ते तसं बोलतात का? असा सवाल त्यांनी केला.

नाचे म्हटलं तर…

कोकणात काही भागात नाचे आहेत. ते होळीला नाचतात पैसे देऊन. त्या दिवशी तोच प्रकार विधानसभेत झाला. आम्ही त्यांना नाचे म्हणतो. आम्ही नाचे म्हटलं तर तुम्ही म्हणाल मलाच नाचे म्हटलं, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुनील प्रभूंची औकात काय?

राणे नेहमी समोर येऊन बोलतात. आता नितेश राणे कुठे दिसत नाहीत, असा टोला शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी लगावला होता. प्रभू यांच्या या टोल्याची राणेंनी खरपूस समाचार घेतला. कोण सुनील प्रभू? त्यांची औकात काय? या ना समोर… समोर येऊन बोला. आम्ही समोरच बोलतो. अनिल देशमुख एवढे दिवस कुठे होते? मध्ये नव्हते ना? तो राठोड की फाटोड तोही अदृश्य होता? तुम्हाला इतिहास माहीत नाही. तुम्ही पीए होता. पीएचं काम लिहायचं असतं. बोलायचं नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

नितेश कुठे आहे का सांगू?

यावेळी त्यांना नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल केला असता राणे भडकलेच. कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख आहे का? असा प्रश्न असतो का? तुम्हाला का सांगू जरी मला माहीत असेल. कायद्याचा दुरुपयोग होतो त्यांना विचारत नाही. त्यांना राणेच वाचा फोडतो. उद्या मीडियालाही काही झालं तरी त्यात राणेंचं योगदान असतं, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

मग लोकसभेचे सर्वच नियम घ्या

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरूनही त्यांनी आघाडी सरकारची खिल्ली उडवली. तुमच्यात एकमत होत नसेल तर तीन पक्षाचे तीन अध्यक्ष करा आणि दोन खुर्च्या वाढवा. एक चांगला अध्यक्ष देऊन सभागृह दर्जेदार चालावं. हे तिघं एकत्र येऊन लूट करत आहेत. भ्रष्टाचार करत आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी गुप्त मतदान होतं. नियमात नसेल तर प्रथा आहे. ते करा. मुख्यमंत्र्यांना ते माहीत नाही. ते सभागृहात येत नाहीत. आले असते तर कळलं असतं, असा चिमटा काढतानाच लोकसभेला फॉलो करण्याचा दावा करत आहात तर लोकसभेप्रमाणेच सर्व करणार का? सर्वच नियम आणि प्रथा लोकसभेच्या घेणार आहात का? असा सवाल त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवार भाजपसोबत? 12 महिने कुणाला बाहेर न बसवण्याचं वक्तव्य

सगळा तामझाम करुन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक करण्याची तयारी, मग नेमकं ट्विस्ट कुठून आलं?; शरद पवारांचा रोल काय?

हा कसला सेनेचा आमदार, काय स्वत:ला शिवसैनिक म्हणवतो, लेकीवरील हल्ल्यानंतर खडसे आक्रमक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.