Ratnagiri : रिफायनरी प्रकल्पासाठी प्रयत्न करेन, अजय कुमार मिश्रा यांचे आश्वासन, रत्नागारीत विविध विकासकामांचा घेतला आढावा

अजय कुमार मिश्रा म्हणाले, महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. त्यावेळी शिवसेना-भाजपसोबत निवडणुका लढली. जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात निकाल दिला. शिवसेनेने विश्वासघात केला आणि सत्तेवर आली होती.

Ratnagiri : रिफायनरी प्रकल्पासाठी प्रयत्न करेन, अजय कुमार मिश्रा यांचे आश्वासन, रत्नागारीत विविध विकासकामांचा घेतला आढावा
अजय कुमार मिश्रा यांचे आश्वासन
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 10:14 PM

रत्नागिरी : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. केंद्र सरकारच्या विविध योजना आणि विकासकामांचा आढावा घेतला. मिश्रा म्हणाले, भाजप निरंतन काम करणारी संघटना आहे. केंद्रासह अनेक राज्यात भाजपचं सरकार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Route) रखडलेले कामदेखील पूर्ण होईल. पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांना पंतप्रधान ग्रामसडक योजने (Pradhan Mantri Gramsadak Yojana) अंतर्गत जोडण्यात येणार आहे. रिफानरी प्रकल्पासाठी जमीन दिली नाही. प्रकल्पासाठी लवकरच प्रयत्न करणार आहोत. आता आमचे सरकार आलंय. आमचे सरकार रिफायनरीसाठी नक्की प्रयत्न करेल. आधीच्या सरकारने जमीन देण्यासंदर्भात सहयोग दिला नाही, अशी टीका अजय कुमार मिश्रा यांनी केली. 2024 मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात (Sindhudurg Lok Sabha Constituency) भाजपचा खासदार होणार आहे. रत्नागिरी विमानतळासंदर्भात चर्चा सुरु आहे. विमानतळासंदर्भात समस्या दूर करून लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केला जातोय.

ईडीने एक लाख कोटींच्या वर संपत्ती जप्त केली

अजय कुमार मिश्रा म्हणाले, महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. त्यावेळी शिवसेना-भाजपसोबत निवडणुका लढली. जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात निकाल दिला. शिवसेनेने विश्वासघात केला आणि सत्तेवर आली होती. जनता दल युनायटेडनी तसेच केलं. आम्ही बिहारमध्ये मोठा पक्ष होतो. आता आम्हाला बिहारमध्ये भाजपला नितीश कुमार यांनी विश्वासघात केलाय. उद्धव ठाकरे देव नाहीत, ते सांगतायत ते सर्व खरे नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत होते. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे स्वतःच्या स्वार्थांसाठी आघाडी सरकार अस्तित्वात आणलं. बिहारमध्ये भाजपला उगाच बदनाम केलं जातंय. भाजपने कुणाला धोका दिला नाही. आपण भाजपला सोडून गेलात. आपणच मुख्यमंत्री होता आणि आता आम्हाला सोडून गेलात आणि पुन्हा मुख्यमंत्रीच झालात. जेडीयूचा इतिहास सर्वांना माहिती आहे. लालू यादव यांचा इतिहास माहिती आहे. ते जेलमधून आता बाहेर आलेत. बिहारमधून नितीश कुमार यांनी भाजपला धोका दिलाय. आठ वर्षात ईडीने एक लाख कोटीच्या वर संपत्ती आणि कॅश पकडली आहे. ईडी सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी करतेय, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसनं थेट पाच कोटी गांधींना दिले

अजय कुमार मिश्रा म्हणाले, यंग इंडिया नवीन कंपनी बनली आहे. काँग्रेस पार्टी या कंपनीचे कर्ज माफ करते. पाच हजार करोड रुपये थेट राहुल गांधी आणि सोनिया यांना देण्याचे काम काँग्रेसने केले. न्यायालयाच्या आदेशावरून ही चौकशी सुरु आहे. जमानत जर रद्द झाली तर ईडीला बदनाम करण्याचं काम केलं जातंय. अपराध्याला मनोबल देण्यासाठी ईडी चौकशीवर प्रश्नचिन्हं निर्माण केलं जातं. संजय राऊत जेलमध्ये आहेत. भाजपमध्ये कुणी चुकीचं काम करणारे नाहीत. ज्यांनी चुकीचे काम केलं आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मग ते कुठल्याही पार्टीमधील असोत. रत्नागिरी सिंधुदूर्गमधील विधानसभा आणि लोकसभेच्या सर्व जागावर भाजपचा विजय होईल. काश्मीरमध्ये चांगले वातावरण आहे. विरोधी पक्ष निराश आहे. त्यामुळे शिंदे-भाजप सरकार पडणार असा आरोप करतायत. पण महाराष्ट्रातील सरकार चांगल्या पद्धतीने चालेल. समान नागरी कायदा आणणे आवश्यक आहे. तो लवकरच आणला जाईल. अर्थव्यवस्थेवर मोदी सरकारने कंट्रोल केले आहे. आपण यावर विविध उपाययोजना करतोय, असंही मिश्रा यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.