12 तारखेची घटना निंदनीय, पण 13ची घटना त्यापेक्षाही निंदनीय, फडणवीसांचं विधान बेजबाबदारपणाचं; यशोमती ठाकूरांचा पलटवार
अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी झालेली घटना निंदनीय आहे. पण 13 तारखेला घडलेली घटना त्याहूनही निंदनीय आहे. या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत.
गिरीश गायकवाड, अक्षय मंकनी, मुंबई: अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी झालेली घटना निंदनीय आहे. पण 13 तारखेला घडलेली घटना त्याहूनही निंदनीय आहे. या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अर्धवट माहिती घेऊन बोलत आहेत. त्यांचं विधान बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा पलटवार अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.
अमरावती हिंसेवरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर या घटनेवर मौन का? असा सवालही त्यांनी केला होता. फडणवीसांची ही पत्रकार परिषद होताच यशोमती ठाकूर यांनी मीडियाशी संवाद साधत फडणवीसांच्या आरोपांचं खंडन केलं. फडणवीस जबाबदार नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत असं वाटलं होतं. पण त्यांनी आज बेजाबाबदारपणे विधाने केली. फडणवीसांची एकदोन वक्तव्य आवडले नाही. ते भडकवत असल्यासारखं वाटलं. हिंदू-मुस्लिम करू नका. अर्धवट माहिती घेऊन ते बोलत आहेत. त्यांनी पूर्ण अभ्यास करावा. त्याच्या पत्रकार परिषदेवर माझा आक्षेप आहे. 12ची घटना निंदनीय आहे. पण 13 तारखेची घटना त्यापेक्षाही अधिक निंदनीय आहे. दोन्ही आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. महाविकास आघाडी सरकार निष्पक्षपाती भूमिका घेत आहे. ज्यांनी कोणी दंगल भडकवली त्याला सोडलं जाणार नाही. आता अमरावती शांत झालं आहे. कोणीही बाहेरून येऊन आमच्या अमरावतीला भडकावू नका, असं आवाहन ठाकूर यांनी केलं.
दंगेखोरांना सोडणार नाही
दोन्हीकडच्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत. सायबरचा रिपोर्ट सर्वांसमोर आहे. दोन्ही कट्टरपंथी दोस्त आहेत. सामान्यांना वेठीस धरलं जात आहे. पण ज्यांनी दंगल भडकवली त्यांना सोडलं जाणार नाही. ज्यांनी 12 आणि 13 तारखेला हिंसा निर्माण केली. त्या दोन्ही समाजातील लोकांवर गुन्हे दाखल होत आहे. दंगल झाली. सर्वांनी पाहिली. सामान्य लोकांनी आधार दिला म्हणून गाव आणि शहर शांत ठेवू शकलो, असं त्या म्हणाल्या.
रझा अकादमीचा फायदा कुणाला होतो सर्वांना माहीत
रझा अकादमी आणि कट्टरपंथीयांचा फायदा कुणाला होत असतो हे संपूर्ण हिंदुस्थानाला माहीत आहे. मला बोलण्याची गरज नाही. ज्या गोष्टी हिंसा निर्माण करतात ज्या संस्था सपोर्ट करतात, जे लोक हिंसक बोलतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. ज्यांनी उद्या काही हिंसा भडकवली तर त्यांच्यावरही कारवाई करू. कुणालाही सोडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
होय, इंटेलिजन्स फेल गेलं
कोणत्याही मोर्चाला परवानगी दिली नव्हती. मोर्चाची परवानगी नाकारली होती. या ठिकाणी इंटेलिजन्स फेल झालं. का झालं यांचं आश्चर्य आहे. इंटेलिजन्स फेल जाण्यास कोणी अधिकारी जबाबदार असेल तर कारवाई करू. इंटेलिजन्स फेल गेलं त्याची चौकशी झालीच पाहिजे. मी कारवाईचा आग्रह धरला आहे. पत्रं तयार आहे. कॅबिनेटमध्ये पत्रं देऊन चर्चा करणार, असं त्यांनी सांगितलं.
National Fast News | फास्ट न्यूज | 9.30 PM | 20 November 2021 pic.twitter.com/HboJiYJTdx
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
संबंधित बातम्या:
UP Elections 2022: योगींनी शेअर केले मोदींसोबतचे फोटो, कोणत्या विषयावर चर्चा? चर्चांना उधाण