यवतमाळच्या शिवभक्तानं घरावरच छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, आर्णीच्या सचिन भोयर यांची संकल्पना

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध शहरातील ढोल पथकांकडून वादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे.

यवतमाळच्या शिवभक्तानं घरावरच छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, आर्णीच्या सचिन भोयर यांची संकल्पना
छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 12:02 PM

यवतमाळ : मार्च 2020 पासून कोरोना (Corona) विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून देशभरात निर्बंध लावण्यात आले होते. गेल्या वर्षी देखील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असल्यानं उत्सवांवर निर्बंध होते. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती छोट्या स्वरुपात साजरी झाली होती. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केलीय जातीय. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध शहरातील ढोल पथकांकडून वादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे. सध्या राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरून राज्यभरात राजकारण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहेय. मात्र, यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील आर्णीच्या सचिन भोयर या शिवप्रेमी तरूणानं एक वेगळाच आदर्श घालून दिलाय. त्यानं चक्क आपल्या घरावरच शिवरायांचा पाच फुटांचा पुतळा स्वत:च्या खर्चातून उभारलाय. शिवाय तो दररोज नित्यनेमानं शिवपूजन करीत शिवजयंती साजरी करीत असतोय.

दिवसाची सुरुवात शिवाजी महाराजांना अभिवादन करुन

सचिन भोयर… यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचा हा शिवप्रेमी युवक आहे. सचिनचं आर्णीतलं घर लोकांसाठी कुतूहल आणि अभिमानाचा विषय बनलंय. त्याच्या घरासमोरून जाणारा प्रत्येकजण अदबीनं झुकतो अन नमस्कारही करतोय. हा नमस्कार असतोय छत्रपती शिवाजी महाराजांना… सचिननं आपल्या घरावरच छत्रपतींचा पाच फुटांचा सुंदर पुतळा बसविला आहेय. सचिनच्या दररोजच्या दिवसाची सुरूवातही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून होतेय.

घरावर पुतळा उभारण्याचं का वाटलं?

सचिनला लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांचा इतिहास, व्यक्तीमत्व आणि विचारांविषयी प्रचंड आकर्षण आणि अभिमान. यातूनच तो वर्षभर शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती करून देणारे विविध उपक्रम राबवित असतोय. यातूनच घर बांधतांनाच शिवरायांचा पुतळा उभारण्याचा विचार त्याच्या मनात आलाय. सार्वजनिक ठिकाणच्या पुतळ्यांची होणारी आबाळही त्यानं सातत्यानं पाहिलीय. त्याच्या या कृतीशील विचारांचा त्याचे शेजारी आणि मित्रांनाही अभिमान आहे.

अलिकडच्या काळात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांवरून राज्यभरात होत असलेलं राजकारण आणि चिखलफेक अस्वस्थ करणारी असल्याचं सचिनला वाटतंय. महाराजांना कृतीतून अंगीकारण्याचं आवाहन तो करतोय. ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी’, असं म्हटलं जातंय. शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज विचार आणि कृतीनं आपल्यात झिरपले तरच ती त्यांना खरी आदरांजली ठरेल, हेही तेव्हढंच खरं आहे.

इतर बातम्या:

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे 4 महिन्यांत काम सुरू; किती मिळाला निधी, हायस्पीड ट्रेनचे स्वप्न सत्यात कधी?

Ajit Pawar | तुम्ही कुणाची सुपारी घेतलीये का?, अजित पवार संतापले

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.