Video: यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात एसटी नेण्याचं चालकाचं अतिधाडस पडलं महागात, एका प्रवाशाचा मृत्यू, मदतकार्य सुरु

महाराष्ट्रात यंदा ठिकठिकणी मान्सूनचा पाऊस जोरदार बरसत आहे. एखाद्या ठिकाणी पाऊस झाल्यास पररिसरातील रस्ते नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळं पाण्याखाली गेल्याच्या अनेक घटना घडत आहे.

Video: यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात एसटी नेण्याचं चालकाचं अतिधाडस पडलं महागात,  एका प्रवाशाचा मृत्यू, मदतकार्य सुरु
एसटी बस वाहून गेली
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 11:19 AM

यवतमाळ: महाराष्ट्रात यंदा ठिकठिकणी मान्सूनचा पाऊस जोरदार बरसत आहे. एखाद्या ठिकाणी पाऊस झाल्यास पररिसरातील रस्ते नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळं पाण्याखाली गेल्याच्या अनेक घटना घडत आहे. अनेक जण या पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून वाहनं नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी यामध्ये जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही एसटी चालकाचं धाडस प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागाव येथील पुलावरून एस टी बस पाण्यात वाहून गेली. या घटनेत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रामस्थांच्या मदतीनं मदतकार्य सुरु

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथून नांदेड-नागपूर ही बस जात होती. दहागाव येथे पुलावरुन प्रचंड वेगानं पाणी वाहत असताना चालकानं पुराच्या पाण्यात बस घातली. चालकाच्या या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याची माहिती आहे. एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. गावकऱ्यांच्या मदतीने बस मधील प्रवासी बाहेर काढणे सुरू आहे. आमदार ससाणे देखील मदत कार्याता सहभागी झाले आहेत. तर, रुग्णवाहिकेनं मृतदेह उमरखेडला पाठवण्यात आला आहे.

बसमध्ये 15 प्रवासी असल्याची माहिती

नांदेड-नागपूर या बसमधून 15 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दहागाव येथे ही बस पाण्यात वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे 15 प्रवाशांचा जीव धोक्यात घातला.

चालकावर काय कारवाई होणार ?

तब्बल 15 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात एसटी नेणाऱ्या चालकावर एसटी प्रशासन काय करणार याकडे लक्ष लागलं आहे.

रायगडमध्येही एसटी चालकाचं धाडस

रायगडमध्ये वाहत्या पाण्याने तुडुंब भरलेल्या पूरसद्र्युश्य रस्ता एसटीने धाडसाने पार केला होता. रायगडमधील महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली होती. अतिव्रुष्टीमुळे नागेश्वरी बंधांरा पाण्याखाली गेला आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन खाडीपट्टयात जाणारा रस्ताही बुडाला होता. असे असताना एसटी चालकाने केलेले धाडस अगांशी येण्याचीही शक्यता होती. मात्र एसटी चालकाने सुखरुप रस्ता पार केल्याने अति घाई सकंटात नेयी, अशी परिस्थीती होती. एस टी मध्ये किती प्रवासी होते, रिकामी होती हे मात्र अद्याप कळू शकले नव्हते, मात्र यवतमाळच्या घटनेत प्रवाशाला जीव गमवावा लागल्याची माहिती आहे.

जीव धोक्यात घालू नका

सध्या गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव जाणवत असून मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणच्या नदी नाल्यांना पूर आल्याच्या घटना घडत आहेत. प्रवाशांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यात वाहनं घेऊन जाऊ नये किंवा पुराच्या पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.

इतर बातम्या:

Bhavana Gawali | शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक

शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन पुन्हा सांगतो, मी चुकीचं काही केलं नाही, मी चौकशीला सामोरे जातोय: अनिल परब

Yavatmal st bus drown in flood at Dahagaon near umarkhed one died rescue work started

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.