Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal Bus : यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात बस वाहून गेली, कंडक्टरसह तिघे बेपत्ता, नेमकी दुर्घटना कशी घडली?

यवतमाळ जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एसटी घालण्याचं चालकाचं धाडस प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागाव येथील पुलावरून एस टी बस पाण्यात वाहून गेली. या घटनेत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yavatmal Bus : यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात बस वाहून गेली, कंडक्टरसह तिघे बेपत्ता, नेमकी दुर्घटना कशी घडली?
बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 5:48 PM

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एसटी घालण्याचं चालकाचं धाडस प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागाव येथील पुलावरून एस टी बस पाण्यात वाहून गेली. या घटनेत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहून गेलेल्या बसमधील दोघाना वाचविण्यात यश आले आहे. आतापर्यंत तिघांचे  मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले असून 1 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. बस कंडक्टकर भीमराव नागरीकर सध्या बेपत्ता आहेत.

नागरीकर यांच्या कुटुंबीयांचा आरोप

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जवळ मुसळधर पावसात एसटी बस थेट पाण्यात कोसळली. या बसवर कंडक्टर म्हणून भीमराव नागरीकर यांची ड्युटी होती, ते सध्या बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांनी भीमराव नागरीकर यांची जबरदस्तीने ड्युटी लावल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. दर सोमवारला त्यांची ड्युटी इतर ठिकाणी असते, पण मानसिक स्थिती नसताना त्यांना नांदेड बसवर पाठवल्याचा आरोप, त्यांचा मुलगा आणि भावाने केलाय. या घटनेला एसटी प्रशासन जबाबदरा असल्याचा आरोपंही त्यांनी केलाय.

क्रेनच्या सहाय्यानं बस नाल्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न

क्रेन च्या साहाय्याने बसला नाल्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, 2 वेळ प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. दहागाव पुलावर पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बस काढणेसाठी येत अडचणी आहेत. पाऊस ही मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं बचावकार्यात अडचणी येत आहेत.

खासदार हेमंत पाटील यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

यवतमाळ उमरखेड दहागाव पुलावरून बस वाहून गेलीय त्या ठिकाणी शिवसेना खासदार हेमंत पाटील दाखल झाले आहेत. पुलाला कठडे नसल्याने ही घटना घडल्याचं पाटील यांनी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे. बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

कसा घडला प्रकार?

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथून नांदेड-नागपूर ही बस जात होती. दहागाव येथे पुलावरुन प्रचंड वेगानं पाणी वाहत असताना चालकानं पुराच्या पाण्यात बस घातली. चालकाच्या या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याची माहिती आहे. एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. आमदार ससाणे देखील मदत कार्यात सहभागी झाले आहेत. तर, रुग्णवाहिकेनं मृतदेह उमरखेडला पाठवण्यात आला आहे.

जीव धोक्यात घालू नका

सध्या गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव जाणवत असून मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणच्या नदी नाल्यांना पूर आल्याच्या घटना घडत आहेत. प्रवाशांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यात वाहनं घेऊन जाऊ नये किंवा पुराच्या पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.

इतर बातम्या:

Video: यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात एसटी नेण्याचं चालकाचं अतिधाडस पडलं महागात, एका प्रवाशाचा मृत्यू, मदतकार्य सुरु

‘जयंत पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत’, शेती नुकसानाच्या पाहणीवेळी पंकजा मुंडेंची टीका

Yavatmal st bus drown in flood at Dahagaon near umarkhed one died three missing with conductor

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.