यवतमाळचे अवलिया गोपालक, ज्यांच्या हाकेवर मागे येतात अनेक गाई
नेर येथे संत उद्धव बाबा गोरक्षण अंतर्गत ते गोरक्षणाचे कार्य गेल्या 25 वर्षांपासून करीत आहेत. पवन जैस्वाल हे नेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आहेत. कधी कत्तलीसाठी जाणारी जनावरे पोलीस पकडतात, तेव्हा पोलीस त्यांच्याकडे ही जनावरे आणतात, तर कधी शेतकरी यांच्याकडील जनावरे जैस्वाल यांच्याकडे आणून देतात. त्यासर्वांची ते स्वतः काळजी घेऊन सांभाळ करतात.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील पवन जैस्वाल यांच्या एका हाकेवर अनेक गाई त्यांच्या मागे लहान मुलांप्रमाणे येतात. त्याचं कारण म्हणजे त्यांची गोसेवा हीच मुक्या प्राण्यांसाठी लळा लावणारी ठरली आहे.
नेर येथे संत उद्धव बाबा गोरक्षण अंतर्गत ते गोरक्षणाचे कार्य गेल्या 25 वर्षांपासून करीत आहेत. पवन जैस्वाल हे नेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आहेत. कधी कत्तलीसाठी जाणारी जनावरे पोलीस पकडतात, तेव्हा पोलीस त्यांच्याकडे ही जनावरे आणतात, तर कधी शेतकरी यांच्याकडील जनावरे जैस्वाल यांच्याकडे आणून देतात. त्यासर्वांची ते स्वतः काळजी घेऊन सांभाळ करतात.
आज त्यांच्याकडे चारशेच्या जवळ गाई आणि जनावरे आहेत. गावाकडे ग्रामस्थांना महागाईच्या काळात सध्या जनावरे पालन करणे कठीण झाले आहे. अशावेळी काही व्यक्ती त्यांच्याकडील जनावरे जैस्वाल यांच्याकडे आणून सोडतात खरे, तर प्रत्येकाने एक दोन गायींचे पालन केल्यास गाव खेड्यात शेती परिसर नंदनवन होईल, असा विश्वास जैस्वाल यांना आहे. यासाठी प्रत्येकाने गायींचे पालन करावे असे त्यांचे म्हणणे आहे.
आजारी असलेल्या गायींची येथे नीट काळजी घेतली जाते. गायींना ढेप आणि चारा भरपूर प्रमाणात मिळावा यासाठी जैस्वाल स्वतः लक्ष देतात. त्यांनी गायींना बारामही चारा उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी 5 एकरमध्ये चारा पिकांची लागवड केली आहे.
तो चारा वर्षभर जनावरांना पुरेसा होतो. येथील गायीच्या गोठ्याची स्वच्छता करणे आणि चारायला घेऊन जाण्यासाठी 10 व्यक्ती येथे मदत करत असतात. संत उद्धव बाबा यांच्या मंदिरात कधी गायी-म्हशी आणि बकऱ्या-मेंढ्या सुध्दा लोकांनी आणून सोडल्या आहेत, त्यांचेही संगोपन पवन जैस्वाल हे करतात.
येथे 12 हजार चौरस फुटावर गोठा असून तेथे गायींची देखभाल केली जाते. उन्हाळ्यात गायींना हिरवा चारा मिळेल अशी व्यवस्था केली जाते. विशेष म्हणजे पवन जैस्वाल यांचा आवाज ऐकताच या गाई हंबरडा फोडतात त्यांच्याकडे गाई धावून येतात आपुलकी आणि माये मुळेच ते सर्व शक्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
‘पांढऱ्या सोन्या’च्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी खानदेशात
खरीपातील पिकांना ढगाळ वातावरणाचा धोका, शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला ?