AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parabhani Suicide : परभणीत रंगपंचमीच्या दिवशीच विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

शुभम दहावी पास असून त्याचा गाडी देण्याचा व्यवसाय होता. तर शुभमचे आई-वडिल शेती व्यवसाय करतात. रंगपंचमीच्या दिवशी सर्वत्र रंगांची उधळण होत आनंदाचं वातावरण असताना शुभमने मात्र विषारी औषध प्राशन करीत आपली जीवनयात्रा संपवली.

Parabhani Suicide : परभणीत रंगपंचमीच्या दिवशीच विष प्राशन करून युवकाची आत्महत्या
परभणीत रंगपंचमीच्या दिवशीच विष प्राशन करून युवकाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 5:16 PM

परभणी : धुलीवंदनानिमित्त सर्वत्र रंगांची उधळण होत असताना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथे एक दुखःद घटना घडली आहे. एका 24 वर्षीय युवकाने विष (Poison) प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची दुःखद घटना उघडकीस आली आहे. शुभम भाऊराव जगताप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सणासुदीच्या दिवशीच शुभमच्या आत्महत्येमुळे पुंगळा गावावर शोककळा पसरली आहे. शवविच्छेदनानंतर पुंगळा गावात शुभमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शुभमने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पुंगळा पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. (Youth commits suicide by consuming poison on the day of Rangpanchami in Parbhani)

धुळवडीच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा

शुभम हा अविवाहित होता. गावशिवारातील शेत आखड्यावर त्याने विषारी औषध प्राशन केल्याची माहिती आहे. शुभमच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. शुभमच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. शुभम दहावी पास असून त्याचा गाडी देण्याचा व्यवसाय होता. तर शुभमचे आई-वडिल शेती व्यवसाय करतात. रंगपंचमीच्या दिवशी सर्वत्र रंगांची उधळण होत आनंदाचं वातावरण असताना शुभमने मात्र विषारी औषध प्राशन करीत आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पुंगळा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

औरंगाबादमध्ये मोबाईलवर व्हिडीओ बनवत तरुणाची आत्महत्या

मोबाईलवर व्हिडिओ बनवत विषारी औषध प्राशन करत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी होळीच्या दिवशी औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात घडली आहे. कन्नड तालुक्यातील एका निर्जनस्थळी बसून व्हिडीओ बनवत दोन बाटल्या विषारी औषध प्राशन करत तरुणाने आत्महत्या केली. सुनील ढगे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तरुणाचा आत्महत्या करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विष प्राशन केल्यानंतर काही वेळातच तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान, या तरुणाने आत्महत्या का केली ? याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Youth commits suicide by consuming poison on the day of Rangpanchami in Parbhani)

इतर बातम्या

पुण्यात संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच खुसपली कात्री! धक्कादायक घटनेनं खळबळ

Latur | पेट्रोल पंपावरून निघाले अन् भरधाव टेम्पोखाली सापडले, लातूर जिल्ह्यात भीषण अपघात, दोन ठार, एक जखमी

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.