भयंकर दुर्घटना, खालापूर येथे अख्ख्या गावावर दरड कोसळली, 60 जण ढिगाऱ्याखाली अडकले, चौघांचा मृत्यू; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

| Updated on: Jul 20, 2023 | 9:19 AM

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यालाही जोरदार पावसाने झोडपले आहे. खालापुरात काल रात्री गावावर दरड कोसळल्याने या दरडीखाली 60 ते 70 जण दबले आहेत.

भयंकर दुर्घटना, खालापूर येथे अख्ख्या गावावर दरड कोसळली, 60 जण ढिगाऱ्याखाली अडकले, चौघांचा मृत्यू; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
Follow us on

खालापूर | 20 जुलै 2023 : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यालाही जोरदार पावसाने झोडपले आहे. खालापुरात काल रात्री गावावर दरड कोसळल्याने या दरडीखाली 60 ते 70 जण दबले आहेत. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

काल रात्री 10.30 ते 11 वाजता ही दुर्देवी घटना घडली. खालापूरच्या इर्शालगडावरील चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे. या वाडीवर रात्री दरड कोसळली. या गावात 40 घरे आहेत. ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच ही दरड कोसळली. त्यामुळे 60 ते 70 जण दरडीखाली दबल्या गेली. ही घटना घडताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. तसेच अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आलं. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी धाव घेतली.

हे सुद्धा वाचा

200 जण अडकले

एनडीआरएफची टीम, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्रीच मदतकार्यास सुरुवात केली. पण पाऊस, धुकं आणि रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्यास विलंब होत होता. तरीही या पथकांनी रात्रीपर्यंत जागून 25 जणांना बाहेर काढलं. त्यातील 21 जणांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दरडीखाली 200 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चिखल चिखल चिखल

दरम्यान, दरडीसोबत मातीचा प्रचंड ढिगारा घरंगळत खाली आल्याने या गावातील घरे जमीनदोस्त झाले आहेत. ही संपूर्ण घरे मातीची होती. कच्ची घरे असल्यामुळे डोंगरकड्यामुळे ही घरे जमीनदोस्त झाली. त्यामुळे अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं. सर्वत्र चिखलच चिखल दिसत होता. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते.

आसपासच्या गावात दहशत

ही दरड कोसळल्यामुळे शेजारीच मोरबे धरण असल्याने आसपासच्या गावात दहशत निर्माण झाली आहे. आता पहाट झाल्याने पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेमची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत रात्रीच घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेल्पलाईन नंबर

8108195554