कांद्यावरुन राष्ट्रवादी-भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली ? जापानमधून फडणवीसांनी काय केलं?

Onion price : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या सगळ्यामध्ये कांद्याच्या पीकाच नुकसान होण्याची शक्यता आहे.

कांद्यावरुन राष्ट्रवादी-भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली ? जापानमधून फडणवीसांनी काय केलं?
devendra fadnavis-Dhananjay Munde
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 12:13 PM

नवी दिल्ली : कांद्याच्या विषयावरुन आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याच दिसत आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने 40 टक्के शुल्क आकारलं आहे. त्याविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. लासलगावसह कांद्याच्या अन्य बाजारपेठामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या सगळ्यामध्ये कांद्याच्या पीकाच नुकसान होण्याची शक्यता आहे.

आज धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा केली. केंद्र सरकार नाफेड मार्फत 2410 रुपये प्रतिक्विंटल भावाने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.

देवेंद्र फडणवीस सध्या जपानमध्ये

केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर राज्यात आता श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याच दिसत आहे. कृषिमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना फोन केले व त्यांच्याशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस सध्या जापान दौऱ्यावर आहेत. श्रेयाची लढाई ?

थेट जपानमधून देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा आणि पियुष गोयल यांना फोन केला. कांदा निर्यात शुल्कबाबत दोन्ही मंत्र्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केली. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे गोयल यांची भेट घेण्यापूर्वीच फडणवीस यांची ट्विट करून माहिती दिली. यावरुन सरकारमध्ये पुन्हा राजकारण सुरु आहे ? श्रेय घेण्याचा भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न ? अशी चर्चा सुरु झाली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.