पुण्यातील कोरोना रुग्णांसाठी आता ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररी’, महापालिकेचा उपक्रम

उपक्रमाद्वारे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यांना घरीच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करुन दिली जात आहे.

पुण्यातील कोरोना रुग्णांसाठी आता 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररी', महापालिकेचा उपक्रम
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 6:41 PM

पुणे : रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांना काही दिवस घरीच होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितलं जातं. मात्र, कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या काही रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल केलं जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेनं ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररी’ हा उपक्रम सुरु केलाय. या उपक्रमाद्वारे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यांना घरीच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करुन दिली जात आहे. (Oxygen Concentrator Library, An initiative of Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरच्याघरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. शहरातील गरजू रुग्णांना वापरण्यास देण्यासाठी या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे. तशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे. पुणे महापालिकेच्या या उपक्रमामुळे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घरी देण्यासाठीच्या अटी

1. नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असेल 2. रुग्णाचा कोड पॉझिटिव्ह रिपोर्ट किंवा संशयित कोविड असणं गरजेचं 3. डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी किती दिवसांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग करण्यास सांगितला याची माहिती 4. रुग्णाचे हमीपत्र 5. रुग्णाचा संपूर्ण निवासी पत्ता व त्याचा पुरावा, इलेक्ट्रिक बिल आणि आधार कार्ड

1 जूनपासून डोअर टू डोअर सर्वेक्षण

पुण्यात 1 जूनपासून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांचं डोअर टू डोअर जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. तशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय. महापालिकेनं कमला नेहरू रुग्णालयात ओपीडी सेंटर तयार केलं आहे. सर्वेक्षणादरम्यान कुणी म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्ण आढळल्यास त्याच्यावर दळवी रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. त्यासाठी दळवी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरुक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिलीय.

पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. अशावेळी काळ्या बुरशीचा धोका टाळण्यासाठी महापालिका अलर्ट मोडवर आहे. त्याचाच भाग म्हणून 1 जूनपासून संपूर्ण शहरात सर्वेक्षण केलं जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचारासाठी 3 लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. तशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वीच दिली आहे.

संबंधित बातम्या :

होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय पुणे शहरासाठी बंधनकारक नाही, महापालिकेची माहिती

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आर्थिक दुर्बल व्यक्तींसाठी मोफत लसीकरण, लतादीदींकडून कौतुक

Oxygen Concentrator Library, An initiative of Pune Municipal Corporation

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.