AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी 2 विमानांची सोय, 100 पर्यटकांची यादी जाहीर

महाराष्ट्रातील अनेक नागरिकही काश्मीरमध्ये अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली आहे. काश्मीरामधील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे.

काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी 2 विमानांची सोय, 100 पर्यटकांची यादी जाहीर
100 पर्यटकांची यादी जाहीर Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 24, 2025 | 12:06 PM

काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये मगळवारी दुपारी झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत गोळ्या घातल्या आणि गदारोळ माजला. यामध्ये देशातील आणि परदेशातील एकूण 26 जमांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचाही समावेश आहे. पहलगाममधील या हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे आणि भीतीचे वातावरण असून जोरदार निषेध करण्यात येत आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील अनेक पर्यटक सध्या काश्मीरला फिरायला गेले असून या हल्ल्यानंतर शेकडो लोकं तिथे अडकले आहेत. सगळीकडे दहशतीचं वाततावरण असून लोकांना लवकरचा लवकर घरी परतण्याचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रातील अनेक नागरिकही तेथे अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली आहे. काश्मीरामधील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. त्या 100 पर्यटकांच्या नावांची यादी जहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे.

कालही सरकारने जम्मू-काश्मीरमधून महाराष्ट्रात परत आणल्या जाणाऱ्या 83 पर्यटकांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे आता एकूण 2 विशेष विमानांनी महाराष्ट्रातील पर्यटक राज्यात परत येऊन आपापल्या घरी सुखरूप पोहोचतील.

एअर इंडियाच्या विशेष विमानाची सोय

मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात X वरील अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून माहिती देण्यात आली आहे. ” काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.” असे त्यात लिहीण्यात आले आहे.

आज संध्याकाळी मुंबईत येणार विमाने

या पोस्टमध्ये पुढे असे लिहीण्यात आले आहे की, ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान 83 पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने 100, असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.” असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील 6 पर्यटकांनी गमावला जीव

काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. त्यापैकी डोंबिवलीचे 3, पुण्याचे 2 तर पनवेलचे एक गृहस्थ होते. अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी हे तिघे डोंबिवलीचे रहिवासी होते. तर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे पुण्यात रहायचे. मृत दिलीप देसले हे पनवेलचे रहिवासी होते. त्यांच्यावर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. पहलगाममधील हल्ल्यानंतर संतापाचे वातावरण असून त्या निषेधार्थ आज डोंबिवली, अमरावती, मालेगाव, परभणीत बंद पुकारण्यात आला आहे.

भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री.