बैसरण येथे पोलीस का नव्हते? याची A टू Z कहाणी, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची जुबानी
जम्मू - कश्मिरच्या पहलगामवर पाकने हल्ला केल्यानंतर भारताने ५ मोठे निर्णय घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची संपूर्ण व्यवस्था कशी केली आहे? सीमेवर आता युद्धाचे ढग जमले आहेत.. या पार्श्वभूमीवर रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन यांनी टीव्ही ९ मराठीशी केलेली बातचीत जशीच्या तशी...

भारत आणि पाकिस्तानातील तणाव जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या पाक पुरस्कृत अतिरेकी हल्ल्यात २६ जणांचा बळी गेल्यानंतर देशभर संतापाचे वातावरण आहे. हा हल्ला म्हणजे भारताच्या गंडस्थळावरचा हल्ला मानला जात आहे. यामुळे कधी नव्हे ते विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. काल सिंधु पाणी वाटप करार रद्द करण्यापासून ते पाकिस्तानची केंद्र सरकारने आर्थिक आणि डिप्लोमॅटीक नाकेबंदी केली आहे. रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन यांनी आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याशी केलेली बातचीत..
जम्मू – कश्मिरच्या पहलगामवर पाकने हल्ला केल्यानंतर भारताने ५ मोठे निर्णय घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची संपूर्ण व्यवस्था कशी केली आहे? सीमेवर आता युद्धाचे ढग जमले आहेत.. या पार्श्वभूमीवर रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन यांनी टीव्ही ९ मराठीशी केलेली बातचीत जशीच्या तशी…
सिंधू जल करार रद्द म्हणजे वर्मी लागलेला वार
सिंधू जल करारच्या निमित्ताने पंतप्रधानांनी पाकिस्तानला मोठा झटका दिलेला आहे. मात्र त्यांना सहा महिन्यांचा लीड पिरेड मिळालेला आहे. कारण या वर्षीची त्यांची नड संपलेली आहे. मात्र सहा महिन्यानंतर याचा मोठा फटका पाकला बसणार आहे. पाकिस्तानने जरी म्हटले असले की पाण्यावर आमचा अधिकार आहे,आम्ही एक थेंब पाणी अडवू देणार नाही. मात्र यावरून असे दिसून येते की हा वार त्यांना चांगलाच वर्मी लागला आहे आणि त्यामुळेच त्यांची तडफड सुरू झाली आहे असेही त्यांनी सांगितले.




घर बॉम्बने उडवले की कशाने ?
मोठ्या कारवाईची सुरुवात फक्त दोन घरं पाडल्याने झाली असं मी म्हणणार नाही. आपले सैनिक ज्या घरात घुसले होते तिथे त्यांना काहीतरी संशयास्पद दिसलं आणि ते घर सेंसर स्फोटांनी त्यांनी उडवलं. ते घर कसे पाडलं की स्फोटाने उडलं हे आता आपल्याला सांगता येणार नाही.मात्र, जे घर बुलडोझरने पाडलं ते घर आपण पाडलेले आहे आणि त्यात आपले लोकल लोकं होते… आणि याच्यावर आता पाकिस्तानचा जोर असणार असेही पटवर्धन यांनी सांगितले.
पाक हा कांगावा करणार …
ज्या लोकांचे घर पाडलं ते आमच्या हद्दीत नाही. त्यामुळे ते आता ही बाब नाकारतील. मात्र बॉर्डरवर ४ वेगवेगळ्या घटना घडल्या आहे. पाकिस्तानचे १२ सोल्जर मारले गेले आहेत. आणि त्यांचे तीन बंकर सुद्धा त्यांनी उडवलेले आहेत. बांधीपुरामध्ये बीएसएफ आणि आर्मीच्या जॉईंट ॲक्शनमध्ये दोन आतंकवादी मारले गेलेत. हा जो प्रकार सुरू झाला आहे त्यामुळे मात्र बॉर्डरवरून कुरघोडी करून आतमध्ये दंगल वाजवायची हा जो त्यांचा प्लान होता. त्यांचा तो प्लान निष्क्रिय झाला आहे. पण आपल्याला सतर्क राहण्याची गरज असल्याचे रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन यावेळी म्हणाले.
आयएनएस विक्रांत खूप उपयोगी ठरणार
आयएनएस विक्रांत हे फार मोठं असेंट आपल्याकडे आहे आणि ते थेट उतरल्याने पाकिस्तानला खूप मोठा इशारा आहे. गुजरात बॉर्डरपासून कराची हे अंतर २००० किलोमीटरच्या आसपास आहे. त्यामुळे आपली विमानं तिथपर्यंत पोहोचणे कठीण होते. आता विक्रांत युद्धनौका जर मध्य समुद्रात गेली तर १०० ते १५० किलोमीटर जवळ जाऊन कराची बंदराला, बाजार बंदराला ते लक्ष करू शकतात. त्यात आर्मीची फायटर विमाने पाकिस्तानच्या नेव्हीला हेरून आणि त्यांना वार करू शकतात….
सिमला करार हा १९७२ मध्ये झाला होता. त्यावेळी पाकिस्तानचे ९३ हजार कैदी आपल्या देशाकडे होते. ते परत न्यायचे आणि दोन देशांमध्ये युद्ध होणार नाही. यासाठी हा करार झाला होता.पंतप्रधान इंदिरा गांधी त्यासाठी तयार झाल्या होत्या.या करारानुसार ठरलं होतं की एकमेकांच्या टेरिटरीचा आदर करायचा. दोघांमध्ये वाद झाल्यास त्यामध्ये तिसरा कोणी येणार नाही. त्याचप्रमाणे जी ‘लाईन ऑफ कंट्रोल’ तयार होईल त्याला कोणीही धक्का लावणार नाही असे ठरले होते असे पटवर्धन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाल की या करारानुसार ९३ हजार कैदी आपण त्यांना पाठवले. सध्या LOC आहे ती सारखी खालीवर खालीवर जाताना दिसते असे पटवर्धन यावेळी म्हणाले.
चीन दबाव निर्माण करणार
ते पुढे म्हणाले की भारत-पाक फाळणीनंतर ४ युद्धे झालेली आहेत आणि त्यानंतर ही बॉर्डर नाहीशी झालेली आहे आणि त्यानंतर इंटरनॅशनल बॉर्डर तयार झाली आहे. त्यानुसार आपण बॉर्डरपर्यंत जाऊ शकतो असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यावेळी सांगितले.चीनची मदत पाकिस्तान घेऊ शकत नाही. कारण या करारात तिसरा कोणी येणार नाही हे आधीच स्पष्ट लिहिलं आहे. पण चीन प्रत्यक्ष फिजिकल हालचाली करणार नाही, पण तो दबाव निर्माण करू शकतो असेही पटवर्धन यांनी सांगितले.
म्हणून बंदोबस्त नव्हता…
चूक अशी झाली आहे की पहलगामच्या बाजूची जे ग्राउंड आहेत ते ग्राऊंड स्टेट गव्हर्मेंट उघडतात. त्याचे नोटिफिकेशन निघतं, अमरनाथ यात्रेच्या वेळी ते उघडलं जातं. मात्र तिथल्या लोकल लोकांनी यावेळी कोणालाही हे सांगितलं नाही. त्यांनी त्या ठिकाणी स्ट्रक्चर उभारलं. खाण्यापिण्याचे स्टॉल उभारण्याचे टेन्ट उभारले आणि टुरिस्ट लोकांना त्या ठिकाणी देण्यात आले. त्याच ग्राऊंडमध्ये नाही तर दुसरीकडच्या ग्राऊंडमध्ये सुद्धा कुठलाही पोलीस बंदोबस्त नव्हता. कारण सरकारला ते ग्राऊंड आता उघडत नाही हे माहीत होतं आणि तिथल्या लोकल लोकांनी हे उघडलं ही बाब सरकारला माहीती नव्हती. म्हणून तिथे पोलीस नव्हते. घटना घडल्यानंतर पोलीस आणि लष्कर तिथे गेले. मात्र त्यांना तास दीड तास लागला. कारण त्या ठिकाणी जाणारे रस्ते म्हणजे पायवाटा आहेत. त्यामुळे तिथे किती वेगाने चालला तरी तीन ते चार किलोमीटर अंतर कापायला.. एक तासापेक्षा अधिक वेळ लागतो असेही रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे.