AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Attack : थोडक्यात बचावले, पण अडकले, अमरावती, बुलढाणा, जळगाव, चाळीसगाव आणि धाराशिवमधील पर्यटकांबाबची अपडेट काय ?

या हल्ल्याच्या वेळी पहलगाममध्येच असलेले पण सुदैवाने वाचलेले महाराष्ट्रातील काही नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अमरावती मधील 11 जणसुद्धा तेथे होते. गोळीबार होण्याच्या काही मिनिटांपूर्वी हे सगळे जण तिथून निघाले. तसेच इतर शहरातील अनेक पर्यटही काश्मीरमध्ये अडकलेत.

Pahalgam Attack : थोडक्यात बचावले, पण अडकले, अमरावती, बुलढाणा, जळगाव, चाळीसगाव आणि धाराशिवमधील पर्यटकांबाबची अपडेट काय ?
पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटक काश्मीरमध्ये अडकलेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2025 | 12:10 PM

संपूर्ण भारतसाह जगाला हादरवणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ल्यात अनेक निरपरांधाचा बळी गेला. त्यामध्ये भारतीय पर्यटकांसह काही विदेशी नागरिकांचाही समावेश होता. काश्मीरमधील हा गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला असून दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. पहलगाममधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी दुपारी सुमारे 6 अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमीही झाले असून त्यांच्यावर रुग्णालयाचत उपचार सुरू आहेत.

या दहशतवादी हल्ल्यामुळे अतिशय भीतीचे वातावरण असून काश्मीरमध्ये फिरण्यास गेलेल्या अनेक पर्यटक घाबरले आहे,त्यांना लवकरात लवकर घरी परतण्याचे वेध लागले आहेत. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचाही समावेश असून पुण्यातील 2, डोंबिवलीतील 3 तर नवी मुंबईतील एकाचा समावेश आहे.

दरम्यान या हल्ल्याच्या वेळी पहलगाममध्येच असलेले पण सुदैवाने वाचलेले महाराष्ट्रातील काही नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अमरावती मधील 11 जणसुद्धा तेथे होते. गोळीबार होण्याच्या काही मिनिटांपूर्वी हे सगळे जण तिथून निघाले होते. सध्या हे सगळे सुखरूप असून ते श्रीनगर मध्ये हॉटेल डेव्हलिप लँड या ठिकाणी थांबलेले आहे. अमरावती मधील मंगला बोडकेची फॅमिली, छाया देशमुख फॅमिली, निता उमेकर फॅमिली. चंदा लांडे फॅमिली, सारिका चौधरी फॅमिली हे सर्व सुखरून असून थोडक्यात बचावले.

हे सुद्धा वाचा

चाळीसगावमधील 14 जण काश्मीरमध्ये अडकले

तर जळगावच्या चाळीसगाव येथील भाजपच्या देवयानी ठाकरे या 14 जणांसह काश्मीरमध्ये अडकल्या आहेत. देवयानी ठाकरे या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष असून त्या त्यांचे पती व सहकाऱ्यांसोबत काश्मीरला फिरण्यासाठी गेल्या होत्या. सध्या त्या श्रीनगर मध्ये एका सुरक्षित ठिकाणी असल्याचं परिवाराकडून सांगण्यात आलं आहे.

सध्या संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्टजारी करण्यात आला आहे. देवयानी ठाकरे लवकरच आपल्या सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्रात परतणार आहेत. त्यांच्या परिवाराशी टीव्ही9 चे प्रतिनिधी खेमचंद कुमावत यांनी संवाद साधला. माझं रात्री आईसोबत बोलणं झालं. आई आणि सोबतचे 14 प्रवासी सुखरून आहेत, असं त्यांचा मुलगा धीरेंद्र ठाकरेंनी नमूद केलं. सध्या ते श्रीनगर मध्ये असून त्या ठिकाणची परिस्थिती अतिशय भीतीदायक आहे, मात्र त्या सुरक्षित आहेत.

जळगावच्या खासदार स्मिता वाघ तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे त्यांच्या संपर्कात आहेत. 25 तारखेची त्यांची विमानाचे तिकीट बुक झालेले आहे, त्या लवकरच महाराष्ट्रात येतील, असंही त्यांनी सांगितलं. भीती पसरवण्यासाठी हा दहशतवादी हल्ला झाला आहे, माझी आई वडील व त्यांच्यासोबतचे सहकारी सुरक्षित असून 25 तारखेला ते महाराष्ट्रात परत येणार आहे असं ते म्हणाले.

जळगावची महिलाही अडकली काश्मीरमध्ये

तर जळगावातील शिव कॉलनीतील नेहा वाघुळदे ह्या पहलगाम मध्ये अडकल्या आहेत. त्या 16 तारखेपासून मैत्रिणींच्या ग्रुपसोबत काश्मीर फिरायला गेल्या होत्या. नेहा वाघुळदे यांचे पती तुषार वाघुळदे यांच्यासोबत प्रतनिधीने संवाद साधला. ज्या वेळी पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी नेहा वाघुळदे परिसरात पर्यटन करत होत्या, अशी माहिती नेहा यांच्या पतीने दिली. यादरम्यान नेहा वाघुळदे यांचं त्यांचे पती तुषार वाघुळदे यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं होतं. याच परिसरात नेहा वाघुळदे ह्या फिरून आल्यानंतर , त्या लॉजवर आल्या. तेथे त्या थांबल्या असताना दुसरीकडे दहशतवादी यांनी हल्ला केला , अस नेहा यांनी सांगितल्याचं तुषार यांनी नमूद केलं.

पत्नीशी बोलणं झालं त्यावेळी त्यांना सैन्य दलाने सुरक्षित स्थळे हलवल्याची माहिती दिली. व्हॉट्सॲप मेसेज द्वारे त्या संवाद साधत असल्याचं तुषार यांनी नमूद केलं. 28 रोजी नेहा वाघुळदे तसेच त्यांच्या सर्व ग्रुप हा परत जळगावला परतणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार फॅमिलीसोबत जम्मू काश्मीरमध्ये

पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार स्वतः उपस्थित होते. ते जम्मू कश्मिर येथे फॅमिली सोबत पर्यटनासाठी गेले आहेत. हल्ला झाला त्या वेळी ते पेहलगाम परिसरात होते. हल्ल्याच्या ठिकाणापासून ते अगदी दोन किमी अतंरावर असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. बिराजदार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत दहशतवादाला देश कधीही झुकू देणार नाही, असे ठामपणे सांगितले. “भारतावर झालेला हा हल्ला भारताच्या नंदनवनावर झालेला आघात असून, तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. केंद्र सरकार व देशाची जनता मिळून दहशतवादाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. बिराजदार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कुशलतेची विचारपूस केली तसेच घटनास्थळी घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

बुलढाण्यातील 5 अडकले, पण सुखरून

तसेच बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण पहेलगाम मध्ये अडकले आहेत. काल पहेलगाम मध्ये फायरिंग झाली तेव्हा हे पाच जण तेथील हॉटेल मधेच होते. ते बाहेर पडणार होते, तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबविले व सांगितले की फायरिंग सुरु झाली आहे, बाहेर फिरायला पडू नका, त्यामुळे ते बचावले.

हे पाच जण 18 तारखेला फिरायला जम्मू काश्मीर मध्ये गेले होते, त्यामध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत. स्थानिक वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचे भाऊ व त्यांची पत्नी व तीन मुले असा समावेश आहेत. फायरिंग च्या आवाजाने सर्वजण खूप घाबरले होते. सध्या जैन परिवार हॉटेल मध्येच आश्रयाला आहेत, ते सुखरूप असल्याचे समजते.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.