मोठी बातमी! ‘सिंधू पाणी वाटप करार स्थगित केलाच नाही’, बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य, दिला त्या पत्राचा संदर्भ
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली असून, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी नाव विचारून गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्थानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतानं सिंधू नदी कराराला स्थगिती दिली आहे, यावरून दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, सिंधू नदी पाणी वाटप करार भारत सरकारनं रद्द केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
पाकिस्तानला पाणी बंद केल्याचं पत्र देण्यात आलं आहे. मात्र पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही असा कुठेही पत्रात उल्लेख केलेला नाही. याचाच अर्थ सिंधू पाणी वाटप करार भारत सरकारनं रद्द केलेला नाही. माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को असं हे पत्र आहे. त्यामुळे त्यांनी जर जनतेला हे पत्र दाखवलं, तर सरकार नेमकी कुठल्या प्रकारची कारवाई करतय हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळे झाक करू नये, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सिंधू वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून सातत्यानं पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबू शकत नाही. कारण ते थांबवण्यासाठीची व्यवस्था आहे का ? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का ? त्यामुळेच पाकिस्तानचे नेते तुम्हाला उचकावत आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.