AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर मी मनोज जरांगे पाटलांना भेटायला तयार’; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'...तर मी मनोज जरांगे पाटलांना भेटायला तयार'; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
Follow us
| Updated on: Jan 26, 2025 | 2:45 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?  

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे,  आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावर आता जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या लढ्याला यश मिळावं, त्यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच त्यांना भेटायला तयार आहे, असं पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या वेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते, मात्र बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वातावरण चांगलंच तापलं, धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी होत होती, धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद मिळालं नाही तर पंकजा मुंडे यांना बीडच पालकमंत्री पद मिळणार का? अशी देखील चर्चा सुरू होती, मात्र अजित पवार हे बीडचे नवे पालकमंत्री झाले आहेत. यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाले तर पंकजा मुंडे यांना जालना जिल्हा देण्यात आला, यावर बोलताना त्या म्हणाल्या की, मला बीड मिळालं असतं तर आनंद झाला असता. मात्र जालना जिल्ह्याचं काम करत असताना माझं जेवढं प्रेम बीड जिल्ह्यावर आहे, तेवढंच प्रेम जालना जिल्ह्यावर देखील असणार आहे. तुमच्या जिल्ह्यानं मला भरपूर प्रेम दिलं. त्यामुळे जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन काम करणार, भेदभाव करणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.