Palghar Bird Flu | पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, चिकन विक्रीची दुकानं, पोल्ट्रीफार्म 21 दिवस बंद ठेवण्याचे आदेश
पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे चिकन विक्रीची दुकानं (Palghar Bird Flu) आणि पोल्ट्रीफार्म 21 दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत.

पालघर : पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे चिकन विक्रीची दुकानं (Palghar Bird Flu) आणि पोल्ट्रीफार्म 21 दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत. त्याशिवाय, एक किलोमीटर परिसरातील चिकन विक्री दुकानांवरील कोंबड्या, अंडी, खाजगी पक्षी तसेच पशुखाद्यची विल्हेवाट लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत (Palghar Bird Flu).

Palghar Bird Flu
पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव
पालघर शहरातील सूर्या कॉलनी येथील सरकारी पोल्ट्रीत अचानक 45 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने बर्ड फ्लूने त्यांचा मृत्यू झाल्याचं सिद्ध झाले आहे.
या मृत कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. बर्ड फ्लू आढळल्यानंतर या सरकारी पोल्ट्रीमधील 500 हून अधिक कोंबड्या आणि अंडी तसेच पशुखाद्य याची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली आहे.
सूर्या कॉलनी येथील सरकारी पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरात खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्व चिकन विक्रीची दुकाने आणि पोल्ट्री फार्म बंद ठेवण्यात आली आहेत. या दुकानांतील कोंबड्या, अंडी, पशुखाद्य तसेच, खाजगी पक्षी यांचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितलं आहे.

Palghar Bird Flu
तसेच, जिल्ह्यात स्थापन केलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत इतर कुकूटपालन केंद्रांमध्ये व चिकन विक्री दुकानांमध्ये तपासणी करून खबरदारीच्या सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येत आहेत.
बाप रे! आता माणसांनाही बर्ड फ्लूची लागण; रशियात H5N8 स्ट्रेनची सात जणांना लागणhttps://t.co/xSc9VSwHN1#birdflu | #H5N8 | #Russia
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
Palghar Bird Flu
संबंधित बातम्या :
बर्ड फ्लू नियंत्रणासाठी सरकारकडून पक्षांची हत्या, मात्र नुकसान भरपाई 2009 च्या तोकड्या दराने
Bird Flu | राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक, नंदुरबारमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांची किलिंग
महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे कोणत्या पक्षाचे किती मृत्यू, राज्याची नेमकी स्थिती काय? वाचा सविस्तर…