मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण, पालघरमध्ये धक्कादायक प्रकार

| Updated on: Feb 01, 2024 | 10:05 PM

 मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या पालघर नगर परिषदेच्या प्रगणकाला (कर्मचाऱ्याला) मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण, पालघरमध्ये धक्कादायक प्रकार
Follow us on

पालघर | 1 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या पालघर नगर परिषदेच्या प्रगणकाला (कर्मचाऱ्याला) मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघरच्या लोकमान्यनगर भागातील एका बिल्डिंगमध्ये ही घटना घडली आहे. मनोज प्रकाश उराडे असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालघरमधील लोकमान्य नगर भागात एका बिल्डिंगमध्ये मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी पालघर नगर परिषदेचे प्रगण (कर्मचारी) गेले असता तेथील एका रहिवाशाने मनोज उराडे यांच्यावर शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आळी आहे. नगर परिषदेतर्फे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण केलं जात आहे. मराठा समाजाचे समाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्याचं काम सुरु आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्याचं काम केलं आहे. असंच सर्वेक्षण पालघरमध्ये सुरु असताना एका कर्मचाऱ्याला अर्वाच्य शिवीगाळ देवून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

मराठी अभिनेत्याचं सर्वेक्षणाला विरोध करणारी वादग्रस्त पोस्ट

या सर्वेक्षणाला काही लोक नकार देत आहेत. विविध धर्माचे नागरीक आणि आरक्षणाला विरोध करणारे नागरीक या सर्वेक्षणाला विरोध करत आहेत. नकार करणाऱ्यांमध्ये मराठी कलाकारांचादेखील समावेश आहे. मराठी अभिनेता पुष्कर जोग याने तर सोशल मीडियावर याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते…ते जर बाई माणूस नसते तर 2 लात नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार”, असं पुष्कर जोग म्हणाला होता. याप्रकरणी मोठा वाद झाल्यानंतर पुष्करने माफी मागितली होती.