Pandharpur Corona : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरु करा, येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करा, आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उद्याच्या कामिका एकादशीला पंढरपूरात गर्दी होण्याची शक्यता आहे. अशावेळी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपुरात प्रवेश करणाऱ्यांची कोरोना चाचणी करा, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलीय.

Pandharpur Corona : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरु करा, येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करा, आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करा- आमदार प्रशांत परिचारक
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 8:17 PM

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे उद्याच्या कामिका एकादशीला पंढरपूरात गर्दी होण्याची शक्यता आहे. अशावेळी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपुरात प्रवेश करणाऱ्यांची कोरोना चाचणी करा, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलीय. राज्य सरकारनं नुकतेच काही नियम शिथिल केले आहेत. पण मंदिरं सुरू करण्याबाबत सरकार उदासीन आहे. गर्दीची अन्य ठिकाणं सुरू आहेत, मात्र मंदिरांवरच बंधन का? असा सवालही परिचारक यांनी केलाय. (MLA Prashant Paricharak’s demand to CM Uddhav Thackeray, Open temple of Vitthal Rukmini)

मुख्यमंत्र्याकडे मंदिर सुरू करण्याची मागणी

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनं पंढरपुरात कहर केला होता. सद्या पंढरपूरमध्ये सरासरी 100 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. यातच सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 800 गेली आहे. रविवारी केलेल्या तपासणीत 128 नव्याने रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून संचारबंदीबाबत विचार केला जात आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून विठ्ठल-रुख्मिणी मंदिर लॉक-अनलॉक पद्धतीने चालू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यापेक्षा पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कोरोना टेस्ट करुनच त्यांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी परिचारक यांनी केलीय. कोरोना चाचणी केल्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल आणि व्यापाऱ्यांचीही उपजीविका भागेल, असं परिचारक यांनी म्हटलंय. त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले भाविक आणि कोरोना चाचणी केलेल्या भाविकांना पंढरपुरात प्रवेश द्यावा, अशी मागणी परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.

पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना वाढतोय!

आषाढी वारी झाल्यानंतर आता पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पंढरपूर प्रशासनानं खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शहरात आणि तालुक्यातील गावोगावी रॅपिड आणि RTPCR चाचणीचे कॅम्प भरवले जाणार असल्याची माहिती पंढरपूर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेतलाय.

पंढरपूर शहर आणि तालुक्यात काल दिवसभरात जवळपास 3 हजार 600 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 128 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरमध्ये कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे पंढरपूर पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूरमध्ये काल 152 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंत आज प्रशासनानं शहर आणि ग्रामीण भागात कोरोना चाचण्या घेतल्या. त्यात तुंगत, कासेगाव, गादेगाव यासह वाखरी आणि अन्य गावांचा समावेश होता.

संबंधित बातम्या :

Thane Unlock : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील व्यापारी वर्गालाही दिलासा, मॉल्स आणि सिनेमागृह मात्र बंदच राहणार, जाणून घ्या संपूर्ण नियमावली

पूरग्रस्त चिपळूणकरांना राष्ट्र सेवा दलाचा मदतीचा हात, 3 दिवस तळ ठोकून आरोग्यसेवा

MLA Prashant Paricharak’s demand to CM Uddhav Thackeray, Open temple of Vitthal Rukmini

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.