पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती दिन; भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक उपाध्याय यांच्या मृत्यूचे रहस्य माहीत आहे का?
25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म झाला. वडील भगवती उपाध्याय भारतीय रेल्वे विभागात नोकरीला होते. आई रामप्यारी यांनी त्यांचा सांभाळ केला. पंडित दीनदयाळ यांचे आईवडील धार्मिक होते.
भारतीय जनता पार्टी (आधीचे भारतीय जनसंघ) सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय (Pandit Deendayal Upadhyay) यांचा आज, 11 फेब्रुवारीला स्मृतीदिन आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक हिंदुत्ववादी विचारवंत आणि भारतीय राजकारणी होते. त्यांनी हिंदू शब्दाचा अर्थ धर्मानुसार नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या रुपात सांगितला. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. शिवाय भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (President of the Bharatiya Jana Sangh) होते. त्यांनी राजकारणाशिवाय भारतीय साहित्यात योगदान दिले. त्यांनी लिहिलेल्या सम्राट चंद्रगुप्त नाटक बहुतेकांना आवडले. श्यामाप्रसाद मुखर्जी (Shyamaprasad Mukherjee) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भारतीय जनसंघाची स्थापना केली. नागपुरात दीनदयाळ उपाध्याय थाली सुरू करण्यात आली. याचे श्रेय माजी महापौर संदीप जोशी यांना आहे. ही थाली मेडिकल येथील रुग्णाच्या नातेवाईकांना पुरविली जाते. हजारो रुग्णांचे नातेवाईक या थालीचा लाभ घेतात. अशाप्रकारे देशभर दीनदयाळ उपाध्याय यांना मानणारे नागरिक आहेत.
लहानपणीच आईवडिलांचा मृत्यू
25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म झाला. वडील भगवती उपाध्याय भारतीय रेल्वे विभागात नोकरीला होते. आई रामप्यारी यांनी त्यांचा सांभाळ केला. पंडित दीनदयाळ यांचे आईवडील धार्मिक होते. दीनदयाळ यांचे आजोबाही रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर होते. लहानपणीचं त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. सात वर्षांचे असताना आईही आजारपणात गेली. याचा फार मोठा आघात त्यांच्या बालमनावर झाला.
भारतीय जनसंघ पार्टीचे सह-संस्थापक
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये भारतीय जनसंघ पार्टीची स्थापना केली. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघ पार्टीचे सह-संस्थापक होते. 1953 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर जनसंघाची जबाबदारी दीनदयाळ यांच्यावर आली. सुमारे पंधरा वर्षे संघटन महामंत्री म्हणून काम केल्यानंतर 1967 मध्ये ते जनसंघाचे अध्यक्ष झाले. 11 फेब्रुवारी 1968 मध्ये रेल्वे यात्रेदरम्यान दीनदयाळ यांच्या मृत्यूने देश हादरला. त्यांच्या रहस्यमय मृत्यूने काही प्रश्न निर्माण झाले होते. कारण त्यांचा मृतदेह उत्तर प्रदेशातील मगलसराय रेल्वे स्टेशन लाईनवर सापडला होता. दीनदयाळ यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे रहस्य अद्याप कायम आहे.
दीनदयाळ यांचा रहस्यमय मृत्यू
दहा फेब्रुवारी 1968 रोजी संध्याकाळी दीनदयाळ लखनौवरून पटणाला जाण्यासाठी सियालदाह एक्सप्रेसमध्ये बसले होते. त्यांची ट्रेन मध्यरात्री दोन वाजता मुगलसरायला पोहचली. परंतु, तिथं दीनदयाळ नव्हते. ट्रेन आल्यानंतर दहा मिनिटांनी त्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या हातात पाच रुपयांची नोट होती. त्यांना जौनपूर येथे मध्यरात्री पाहिले गेले होते. त्यांच्या मृत्यूचा तपास सीबीआयने केला. सीबीआयने भरतलाल आणि त्यांच्या सहकाऱ्याला त्यांच्या हत्येच्या आरोपात अटक केली गेली. चोरी केल्यानंतर दीनदयाळ यांना ट्रेनमधून धक्का मारून बाहेर फेकले असावा, असा अंदाज आहे.