पंकजा मुंडेंनी ‘वजन’ कसं घटवलं? वाचा खास टिप्स त्यांच्याकडूनच!

पंकजा यांना राज्यातील जनतेला फिटनेसबाबत काय टीप्स द्याल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी स्वत:चा अनुभव शेअर केला (Pankaj Munde gives tips about how lose weight)

पंकजा मुंडेंनी 'वजन' कसं घटवलं? वाचा खास टिप्स त्यांच्याकडूनच!
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 4:18 PM

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला आज विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर मनसोक्तपणे प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे यांनी गेल्या सहा महिन्यात फिटनेसबाबत अधिक काळजी घेतली. त्यामुळे त्यांचं वजन घटलं आहे. मुलाखतीदरम्यान पंकजा यांना राज्यातील जनतेला फिटनेसबाबत काय टीप्स द्याल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी स्वत:चा अनुभव शेअर केला (Pankaj Munde gives tips about how lose weight)

“मी मंत्री असताना प्रचंड कामाचा व्याप होता. आताही व्याप आहेच. फक्त कोरोनाचा जो ब्रेक मिळाला त्याचा पूर्णत: मी फायदा आरोग्य आणि फिटनेससाठी करुन घेतला. त्याचा फायदा असा की, माझं 2014 मध्ये जितकं वजन होतं तितकचं वजन आता झालं आहे. वडील गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर प्रचंड तणाव आणि जबाबदारी आली. त्यामुळे साहजिक तणावाचा परिणाम तब्येतीवर होऊन माझं वजन वाढलं होतं. ते मला नेहमी टोचायचं. मला फिटनेसची आवड आहे. त्यामुळे मी गेले सहा महिने पूर्णवेळ फिटनेसला दिले”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

“मी फिटनेसबाबत महिला आणि पुरुषांना सर्वांना टीप्स देईन. आपण कधीकधी फक्त करिअरचा विचार करत त्यामागे धावत असतो. आपण सर्व गोष्टी बाजूला ठेवतो आणि आपल्या करिअरसाठी धडपड करतो. काही महिला कधीकधी आपल्या परिवारासाठी इतक्या स्वत:ला वाहून घेतात की त्यांना स्वत:कडे लक्ष देता येत नाही. पण आपण जर फिट असलो तर आपला परिवारही फिट असतो. आपण स्वत: आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण स्वत: फिट राहिलो तर आपण दुसऱ्यांची मदत करु शकतो”, असं पंकजा म्हणाल्या.

“मंत्री असताना मला अनेक ज्येष्ठ लोकांनी फिटनेसच्या सूचना दिल्या होत्या. माझा अभिनेत्री शिल्फा शेट्टींसोबत परिचय झाला होता. त्या खूप योगासन करतात. अभिनेत्री अक्षय कुमार यांच्याशी जेव्हा परिचय झाला तेव्हा त्यांनीदेखील आम्हाला वजन कसं कमी करावं याबाबत सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या सूचना मी फक्त ऐकायची. पण या सूचना मी गेल्या सहा महिन्यात अंमलात आणल्या. फिटनेसची सवय लागून जाते”, असंदेखील त्या म्हणाल्या.

“आपण फिटनेसची सवय लावून घेतली पाहिजे. जसं आपण दोनवेळा जेवतो तसं रोज व्यायाम आणि डायटिंग याच्यावर लक्ष दिलंच पाहिजे. एकदा चांगलं दिसायची, फिट राहायची सवय लागली तर आपण त्याच्यातून बाहेर पडत नाही”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं (Pankaj Munde gives tips about how lose weight).

’14 किलो वजन कमी केलं’

“राज्यात माझ्या फिटनेसची चर्चा आहे हे मला माहित नव्हतं. खरंतर मी 2014 साली अशीच होती. पण वडिलांच्या मृत्यूनंतर मी तणावात होते. सर्व जबाबदाऱ्या पडल्या. त्याचा जेवणावर परिणाम झाला होता. जेव्हा मी डॉक्टरांना भेटले तेव्हा त्यांनी तणावामुळे वजन वाढत असल्याचं सांगितलं. माझ्या घरात सर्वच फिट आहेत. त्यामुळे ही बाब मला सारखी सलत राहायची. मलाही वाटायचं की आपणही फिट राहिलं पाहिजे. मी कामात इतकी व्यस्त होती की मी स्वत:कडे बघू शकली नाही. अखेर माझ्या लक्षात आलं की नाही आता भरपूर झालं. त्यात कोरोना आल्यामुळे थोडा वेळ मिळाला. त्या वेळेचा मी पूर्ण सदूपयोग केला. मी जवळपास 14 किलो वजन कमी केलं”, असं पंकजा यांनी सांगितलं.

वजन कसं कमी केलं?

“माझं रोजचं रुटीन आता परत सुरु झालं आहे. सकाळपासून मी बाहेरच आहे. मला या रुटीनमध्ये फिटनेस सांभाळायची चिंता वाटते. पण वजन कमी करताना मी आहारावर खूप लक्ष दिलं. सुरुवातीला यूट्यूबवर व्हिडीओ बघितले. मी योगासने करायला लागले. त्यानंतर मी कमी व्यायाम केला. पण मी आहारावर विशेष लक्ष दिलं. आता भरपूर फळं खाते. भाज्यांचे जूस पिते. भात, वरण, भाकरी खाणं फार कमी केले. फक्त एक भाकरी असा माझा आहार आहे. मी रात्री साडेआठ वाजता जेवण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत फळ आणि चहाशिवाय काही खात नाही. सकाळचा नाष्टाही मी बंद केला आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘जागरणमुळे वजन वाढतं’

“खरंतर जागरणमुळे वजन वाढतं. पूर्वी आमचं जागरणही खूप व्यायचं. आता कोरोनामुळे दौऱ्याचा वेळ बदलला आहे. माझी झोप फार कमी आहे. पाच ते सहा तासांपेक्षा जास्त वेळ झोपत नाही. पण शांत झोप हवी. त्यासाठी मी यूट्यूबवर मेडिटेशनचे व्हिडीओ बघते”, असं त्यांनी सांगितलं.

“कार्यकर्ते म्हणतात, ताई तुमची तब्येत खूप खराब झाली. पण म्हणते, नाही माझी तब्येत छानच आहे. मला फिट राहायला आवडतं. पूर्वी मी आणि माझे पती नेहमी जिमला जायचो. माझा मुलगाही जीमला जातो. आता जीम सध्या बंद आहे”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

हेही वाचा : धनंजय मुंडेंना टार्गेट करणाऱ्या गुट्टेंना पहिल्यांदाच थेट उत्तर !

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.