Pankaja calls Dhananjay | अपने तो अपने होते है | पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना फोन, तब्येतीची विचारपूस
धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बहिण पंकजा मुंडे यांनी सर्व मतभेद बाजूला सारुन फोन करत तब्येतीची विचारपूस केली (Pankaja Munde calls Dhananjay Munde).
मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्व मतभेद दूर ठेवून धनजंय मुंडे यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली (Pankaja Munde calls Dhananjay Munde).
सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पंकजा आणि धनंजय या दोन्ही भाऊ-बहिणींमधील मतभेद बघायला मिळाले होते. मात्र, आता धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बहिण पंकजा मुंडे यांनी फोन करत तब्येतीची विचारपूस केली. “प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा”, असं पंकजा फोनवर धनंजय मुंडे यांना म्हणाल्या (Pankaja Munde calls Dhananjay Munde).
धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या चांगली असून मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. धनंजय मुंडे यांना श्वास घेताना थोडा त्रास जाणवत असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. याशिवाय ते 8 ते 10 दिवसात कोरोनावर मात करतील, असा विश्वास आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
धनंजय मुंडे हे बीडमधील परळीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा देण्यात आली.
ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला संसर्ग
ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली. (NCP Minister Dhananjay Munde COVID Positive)
संबंधित बातम्या :
Dhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण
Dhananjay Munde COVID | आरोग्य मंत्र्यांचा धनंजय मुंडेंना फोन, प्रकृतीबाबत राजेश टोपे म्हणतात…