Pankaja Munde: मी राजकारणाला चिटकून बसणारी नाही…पंकजा मुंडे यांनी कोणाला दिला इशारा
Pankaja Munde Dasara Melava 2024: छत्रपती घराण्याने गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केलं. मी उदयनराजेंच्या प्रचाराला गेले. त्यांनी मला त्यांच्या देवघरात नेलं. माझ्या हाताने आरती केली. त्यानंतर एका घरात नेलं तिथल्या खांबावर त्यांच्या वडिलांचा आणि गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. आम्ही जात बघून काम करत नाही.
Pankaja Munde: लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्या पराभवानंतर बीडमधील पाच युवकांनी स्वत:चे जीवन संपवले होते. त्याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात केला. तसेच पक्षातील विरोधक आणि विरोधकांनाही इशारा दिला. पंकजा म्हणाल्या, मी गरीबांसाठी काम करणारी आहे. राजकारणाला चिटकून बसणारी नाही. पाच लेकरांनी जीव दिला. त्या आमदारकीचं काय गोड वाटणार आहे. आमदारकी खासदारकी काही नव्हती, तरीही पाच वर्ष तुम्ही आला. उद्याही याल. आपल्याकडे काही असो नसो मी तुमच्या मागे येणारच. जो वंचित आहे. ज्याची पत आणि ऐपत नाही. अशा लोकांसाठी मी राजकारणात आहे. गाड्या घेण्यासाठी नाही. टेबलाखालून पैसे घेण्यासाठी नाही. तुम्ही म्हणता म्हणून मी हेलिकॉप्टरने येते. तुम्ही म्हटला तर बैलगाडीतून येईल, असे दसऱ्या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले.
तुमचं जीवन सुसह्य केल्याशिवाय थांबणार नाही…
कितीही वर्ष लागो तुमचं जीवन सुसह्य केल्याशिवाय मी श्वास घेणार नाही. तुमच्या मुलांच्या अंगावरचा मळका शर्ट पाहून मला वेदना होते. पंकजा मुंडे कुणाला घाबरत नाही. अंधारात भेटत नाही. पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते. या मैदानात माझं भाषण ऐकायला लोकं येणार नाही त्या दिवसाला घाबरते.
भगवान बाबांना प्रार्थना करते असा दिवस कधीच येऊ देऊ नको. मी मंत्री असताना विकास केला. रस्ते दिले. या बीड जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला. एकही गाव सोडलं नाही. यावेळी गडबड झाली. आपल्याला ही गडबड दुरुस्त करायची आहे.
छत्रपती घराण्यांचे गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम
छत्रपती घराण्याने गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केलं. मी उदयनराजेंच्या प्रचाराला गेले. त्यांनी मला त्यांच्या देवघरात नेलं. माझ्या हाताने आरती केली. त्यानंतर एका घरात नेलं तिथल्या खांबावर त्यांच्या वडिलांचा आणि गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. आम्ही जात बघून काम करत नाही. आम्ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायचं आहे. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं आहे.
बाबासाहेब म्हणायचे शिक्षण वाघिणीचं दूध आहे. ते प्यायलेला गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जे गुरगुरत आहात ते शिक्षणामुळेच. पुण्यश्लोक लागतं का कुणाच्या मागे. अहिल्यादेवींच्याच मागे लागले आहे.
आमच्या लोकांना त्रास दिला तर आम्ही त्यांचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्याकडे येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सगळीकडे येणार आहे. चांगल्या दिवसाची लोक वाट पाहत आहेत. त्यासाठी मी येत आहे. आता तयारी करा. कोयते घासून ठेवा. पाऊस पडला आहे. दिवाळी केल्याशिवाय जाऊ नका. मी हरल्यामुळे नाराज होऊ नका.
हे ही वाचा…
पंकजा मुंडेसोबत व्यासपीठावर आलेला तो गोरागोमटा युवक कोण? पंकजांनी का बोलवले व्यासपीठावर…