VIDEO: तर तो माझा शेवटचा क्षण असेल, धनंजय मुंडेंच्या आरोपांवर pankaja munde यांचा पलटवार

माझ्या सत्ताकाळात एकही माणूस माझ्यापासून दुरावला नाही. चांगल काम केले पाहिजे, करुन घेतले पाहिजे. संघर्षाला तयार राहिले पाहिजे. माझे ऑपरेशन झाले. बोलायला घसा दुखतोय आणि बीडच्या बदनामीचं माझ्यावर खापर फोडलं जातंय.

VIDEO: तर तो माझा शेवटचा क्षण असेल, धनंजय मुंडेंच्या आरोपांवर pankaja munde यांचा पलटवार
धनंजय मुंडेंच्या आरोपांवर pankaja munde यांचा पलटवार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 5:02 PM

बीड: माझ्या सत्ताकाळात एकही माणूस माझ्यापासून दुरावला नाही. चांगल काम केले पाहिजे, करुन घेतले पाहिजे. संघर्षाला तयार राहिले पाहिजे. माझे ऑपरेशन झाले. बोलायला घसा दुखतोय आणि बीडच्या बदनामीचं माझ्यावर खापर फोडलं जातंय. माझ्यावर आरोप करताय की पंकजा मुंडेनी जिल्ह्याची बदनामी केली. मी कधी बदनामी सारखे काम केले का? तसे काम केले तर तो माझा शेवटचा क्षण असेल, असा पलटवार भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्यावर केला. धनजंय मुंडे यांनी बीड (beed) जिल्ह्याच्या बदनामीला पंकजा यांना जबाबदार धरलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. बीड येथील शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पंकजा यांनी आघाडी सरकारवरही चौफेर हल्ला चढवला.

लोक आज माझ्या आणि प्रीतम यांच्या नावाने आपल्या मुलींची नावे ठेवतात. लोक आपल्या मुलांचे नाव ठेवताना आमचा चेहरा समोर आणून ठेवतात. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपले सरकार येणारच आहे. लोक घरी आणून मत देतील असे काम विरोधकांनी केले. एवढे वाईट काम या सरकारमधील लोकांनी केले आहे, असंही त्या म्हणाल्या.

माझ्याकडे ना ऑफिस, ना फार्म हाऊस

जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. माझ्याकडे कोणतेही फार्म हाऊस नाही. मोठे ऑफिस नाही. राजकारणात ज्यांचा अहंकार जास्त होतो त्याचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही, अशी टीकाही त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केली.

आजच्या सत्ताधाऱ्यांनी एक तरी काम केलं का?

महिला सत्संगाला जातात. मी पण सत्संग ऐकते. मी रामकथा ऐकल्या. त्यात चांगल्या लोकांना त्रास होतो. ज्याला वनवास, त्रास आहे, त्यालाच इतिहास रचायला मिळतो. माझा संघर्ष स्वतःसाठी नव्हता केवळ प्रवृत्ती बदलण्यासाठी होता. मोदींच्या नेतृत्त्वात सायकलवरुन जाणाऱ्या नेत्यांना मंत्री केले. मी जिल्हा परिषद एवढी मोठी केली पण एकतर काम आजच्या सत्ताधाऱ्यांनी केले का?, असा टोलाही त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

संबंधित बातम्या:

राजकारणात कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते, राऊतांच्या विधानावर pankaja munde यांची सूचक प्रतिक्रिया

ST Strike : एस.टी. कर्मचाऱ्यांवरच्या कारवाईला स्थगिती, कोर्टात नेमकं काय घडलं? सदावर्तेंनी 10 मोठे मुद्दे मांडले

Ajit Pawar : व्यापाऱ्यांना ‘अभय’, 10 हजार रुपयांची थकबाकी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.