पंकजाताईंविरोधात पुड्या कोण सोडतंय? त्या कसं उत्तर देतायत?; वाचा बित्तंबातमी!

पंकजा मुंडे यांना येनकेनप्रकारे खिंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव असून पंकजाताईंनीही विरोधकांचा हा डाव उधळून लावत मी बीडमध्येच आहे, असं प्रत्युत्तर दिलं आहे. (pankaja munde slams opposition over allegations)

पंकजाताईंविरोधात पुड्या कोण सोडतंय? त्या कसं उत्तर देतायत?; वाचा बित्तंबातमी!
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 8:14 AM

बीड: आधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड येथील ग्रामपंचायतीचे सदस्य राष्ट्रवादीत दाखल झाल्याची वावडी उठवण्यात आली… पण त्यात काही तथ्य नसल्याचं उघड झालं…. त्यानंतर आता पंकजाताई बीडमध्ये आणि परळीत नसतात अशी पुडी सोडण्यात आली आहे… पंकजा मुंडे यांना येनकेनप्रकारे खिंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव असून पंकजाताईंनीही विरोधकांचा हा डाव उधळून लावत मी बीडमध्येच आहे, असं प्रत्युत्तर दिलं आहे. (pankaja munde slams opposition over allegations)

बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमकी उडत असतात. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पंकजा मुंडे यांना वारंवार खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो. पंकजा मुंडे यांचं बीडमधील वर्चस्व कमी करण्यासाठी वारंवार वावड्या उठवल्या जातात. त्यातील त्यांच्यावर करण्यात येणारी टीका म्हणजे त्यांचं मुंबईतील वास्तव्य. पंकजाताई बीड किंवा परळीत नसतातच. त्या मुंबईत असतात, अशी वावडी उठवून पंकजा मुंडेंना पराभूत झाल्यामुळे मतदारसंघाबाबत काहीच घेणंदेणं पडलेलं नाही, असं विरोधकांना ठसवायचं असतं. पण विरोधकांच्या या आरोपांचा पंकजाताईही तितक्याच ताकदीने समाचार घेत आहेत.

क्या हार में क्या जीत में

भोपाळ असो की जन्मस्थान परळी… लोकांच्या डोळ्यातील प्रेम आणि अपेक्षा मला सातत्याने शक्ती देतात… कोणी तरी चर्चेची पुडी सोडली, पंकजाताई जिल्ह्यात किंवा परळी येथे नसतात. बाबांनो, मी 10 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून आणि मी केलेल्या कामांच्या रूपाने आहेच आणि भविष्यात राहणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे. कोविड19 च्या काळात नियमांचे पालन केले आणि ऑगस्टपासून आता सर्वच ठिकाणी असते… क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही वह भी सही… माझ्या मतदारसंघात 92000 आणि राज्यभर हजारो लाखो लोकांचा विश्वास ही माझी पूंजी आहे आणि पुण्याई माझ्या प्रिय पित्याची आणि नेत्याची आहे… असं भावुक उद्गारही त्यांनी काढलं आहे.

जनता दरबार, शेकडो उपस्थिती

पंकजा मुंडे 9 जानेवारी रोजी परळीला आल्या होत्या. या ठिकाणी त्यांनी जनता दरबारचं आयोजन केलं होतं. पंकजाताई आल्या म्हटल्यावर शेकडो लोकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेऊन त्यांची भेट घेतली. त्यांना तक्रारीचे निवेदन दिलं. तरुण कार्यकर्त्यांपासून ते अबाल वृद्ध आणि महिलाही मोठ्या संख्येने आले होते. पंकजा मुंडे यांनीही गावकऱ्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांची निवेदने स्वीकारली आणि त्यांच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले.

निवडणुकीची मोर्चेबांधणी

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. पंकजा यांनीही 8 जानेवारी रोजी दिवसभर ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा घेतला. कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर वैद्यनाथ आणि पानगाव साखर कारखान्याच्या कामाचाही आढावा घेतला. सर्व सामान्य जनतेच्या भेटी, त्यांची खासगी व सार्वजनिक कामे आटोपून संध्याकाळी परळी शहरातील कार्यकर्त्यांच्या घरी जेवण घेतले. शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना भेटले, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, असं पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. (pankaja munde slams opposition over allegations)

संबंधित बातम्या:

Pankaja Munde | … आणि पंकजा मुंडे हळहळल्या

‘ये पब्लिक सब जाणती है’, राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा : बाळा नांदगावकर

नेत्यांच्या सुरक्षेत कपात, आता वातावरण तापलं; भाजप, मनसे नेते काय म्हणाले? (pankaja munde slams opposition over allegations)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.