परळीत पंकजा मुंडेंच्या ऑफिसबाहेर काळे झेंडे दाखवून निदर्शने, पंतप्रधानांनी 12 कोटी जनतेची माफी मागण्याची काँग्रेसची मागणी
पंतप्रधान मोदींनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी परळी शहर काँग्रेसच्या वतीने मोदीविरोधी घोषणा दिल्या गेल्या. काँग्रेसने आंदोलन करत काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी नाही मागितल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येईल, असा इशाराही देण्यात आला.
संभाजी मुंडे| बीड (परळी): पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर केलेल्या आरोपांविरोधात आज राज्यभरात काँग्रेसच्या वतीने निषेधात्मक आंदोलन (Congress Agitation) करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेतून या आंदोलनाचे सूतोवाच केले होते. राज्यातील शहरा-शहरातील भाजप कार्यालयाबाहेर निदर्शने केले जातील असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्यानुसार, परळीमध्येही आज भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काँग्रेसने आंदोलन करत काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी नाही मागितल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येईल, असा इशाराही देण्यात आला.
काँग्रेस शहराध्यक्षांच्या नेतृत्वात आंदोलन
परळीत काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद प्रस्तावावर काल बोलताना महाराष्ट्राचा अपमान केला. हा महाराष्ट्रातील 12 कोटीजनतेचा अपमान आहे. त्यामुळे मोदींनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी परळी शहर काँग्रेसच्या वतीने मोदीविरोधी घोषणा दिल्या गेल्या. काँग्रेसने आंदोलन करत काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी नाही मागितल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येईल, असा इशाराही देण्यात आला.
पंतप्रधानांच्या कोणत्या वक्तव्याचा निषेध?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. मात्र काँग्रेसवाले परिस्थिती बिघडण्याची वाट पहात होते. जागतिक आरोग्य संघटना सांगत होती की, लोकांनी आहे तिथेच थांबावे. परंतु काँग्रेसने तेव्हा महाराष्ट्रातील परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता.
इतर बातम्या-