Parbhani | आयुष्यभर ज्या विद्युत खांबावर कर्तव्य बजावलं, त्यावरच जीवन संपवलं, पाथरीत विचित्र आत्महत्या!
परभणी| परभणी जिल्ह्यातील (Parbhani) पाथरी शहरात एक दुःखदायक घटना समोर आली आहे. येथील एका ज्येष्ठ लाइनमने वीजेच्या पोललाच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. आयुष्यभर वीजेच्या खांबावर चढून त्याची देखभाल-दुरुस्तीचं कर्तव्य बजावणाऱ्या या व्यक्तीने अशा प्रकारे एकाएकी जीवन संपवल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पाथरी शहरात या आत्महत्येची चर्चा सध्या आहे. दरम्यान, पोलिसांनी (police) […]
परभणी| परभणी जिल्ह्यातील (Parbhani) पाथरी शहरात एक दुःखदायक घटना समोर आली आहे. येथील एका ज्येष्ठ लाइनमने वीजेच्या पोललाच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. आयुष्यभर वीजेच्या खांबावर चढून त्याची देखभाल-दुरुस्तीचं कर्तव्य बजावणाऱ्या या व्यक्तीने अशा प्रकारे एकाएकी जीवन संपवल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पाथरी शहरात या आत्महत्येची चर्चा सध्या आहे. दरम्यान, पोलिसांनी (police) सदर प्रकरणाची चौकशी केली असता, कौटुंबिक कारणामुळे सदर व्यक्तीने आत्महत्या केल्याचे कारण प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे. मात्र पहाटेच्या वेळीच वीजेच्या खांबाला गळफास घेतल्याच्या या विचित्र घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
64 वर्षीय ज्येष्ठाची आत्महत्या
पाथरी शहरातील 64 वर्षीय दुर्योधन गवई यांनी केलेल्या आत्महत्येमुळे सध्या खळबळ माजली आहे. गुलजार नगर येथे सदर घटना घडली. दुर्योधन गवई हे सेवानिवृत्त असून दोनच दिवसांपूर्वी त्यांचे काही कौटुंबिक वाद झाले होते. याच वादातून त्यांनी आत्महत्या करेन, अशी धमकी पत्नीला दिली होती. शनिवारी पहाटे त्यांनी अचानक आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
पहाटे घरासमोरील खांबावर गळफास
पहाटेच्या वेळी पाथरी तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला. दुर्योधन गवई यांनी घरासमोरीलच खांबाला गळफास घेतला. त्यामुळे अवघ्या शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आयुष्यभर ज्या वीज खांबावर चढून कर्तव्य बजावले, त्यालाच कवटाळून जीवन संपवल्याने या घटनेची जास्त चर्चा होत आहे. पाथरी पोलीस सकाळीच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करण्यासाठी शव ताब्यात घेतले. शवविच्छेदन करण्यासाठी सदर मृतदेह पाथरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. अद्याप या घटनेबाबत गुन्हा नोंद कऱण्यात आलेला नाही.
इतर बातम्या-