जालनावरून जिंतूर मार्गे परभणी जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बस मंठा येथे थांबवल्या, 7 बसफेऱ्या देखील रद्द

काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उद्या आंबेडकरी संघटनांनी मंठ्यात बंदची हाक दिली असून उद्या देखील काही बस रद्द होण्याची शक्यता आहे.

जालनावरून जिंतूर मार्गे परभणी जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बस मंठा येथे थांबवल्या, 7 बसफेऱ्या देखील रद्द
जालनावरून जिंतूर मार्गे परभणी जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बस मंठा येथे थांबवल्या (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 5:07 PM

परभणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची काल एका समाजकंटकाने विटंबना केली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज परभणी शहरात बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला आज हिंसक वळण लागलं. आंदोलकांकडून काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. या घटनेचा सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम पडताना दिसतोय. परभणीच्या दिशेला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या जवळपास 15 गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तसेच जालन्यातील परतूर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या 7 बसफेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

परभणीत जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर इतर जिल्ह्यातून जालना मार्गे परभणी आणि जिंतूर जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बस जालन्यातील मंठा येथील बसस्थानकावर थांबवल्या आहेत. तर जालन्यातील परतूर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या 7 बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उद्या आंबेडकरी संघटनांनी मंठ्यात बंदची हाक दिली असून उद्या देखील काही बस रद्द होण्याची शक्यता आहे.

परभणीत तणावाची स्थिती

परभणीत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही आंदोलन आणि प्रशासनामध्ये तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित होईल, अशी स्थिती असताना, काही आंदोलन त्यात महिलाही सहभागी होत्या, त्यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आली. त्यामुळे परभणीत तणावाची स्थिती कायम आहे. या दरम्यान आता पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. लोकप्रतिनिधींकडून सर्व आंबेडकरी अनुयायांना शांततेचं आवाहन केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

लोकप्रतिनिधींकडून जनतेला मोलाचं आवाहन

दरम्यान, परभणीत दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांनंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यानंतर लोकप्रतिनिधींकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे.

परभणीतील घटना निषेधार्य आहे. परभणी पोलिसांनी माथेफिरूला अटक केली आहे. परभणीकरांच्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नांदेड परिक्षेत्राच्या डीआयजीसोबत बोलणं झालं आहे. परभणीकरांनी कायदा-सुव्यवस्था पाळावी, असं आवाहन भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडून करण्यात आलं आहे.

‘संविधान सगळ्यांसाठी सर्वोच्च’, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

भाजप नेते गिरीश महाजन यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “परभणीमध्ये केलेलं कृत्य एका माथेफिरुने केले आहे. तो ठार वेडा आहे. त्याची परभणीकरांना कल्पना पण आहे. त्याला अटक केली आहे. संविधान सगळ्यांसाठी सर्वोच्च आहे. कायदा हाती घेत सामाजिक सलोखा बिघडेल असे कृत्य करु नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्वांनी सहकार्य करावे”, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.