Parli Vidhan sabha : परळीत धनंजय मुंडे यांना कोण देणार आव्हान, कोणाच्या नावाची चर्चा?

विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्याआधी प्रत्येक इच्छूक उमेदवाराकडून जोरदार तयारी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी परळी मतदारसंघातून यंदा कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढलीये. त्यामुळे विरोधी पक्ष कोणाला तिकीट देणार हे पाहावे लागेल.

Parli Vidhan sabha : परळीत धनंजय मुंडे यांना कोण देणार आव्हान, कोणाच्या नावाची चर्चा?
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 5:30 PM

Parli Assembly Election 2024 : महाराष्ट्र्रातील अनेक असे मतदारसंघ आहेत जे नेत्यांची खास ओळख बनले आहेत. महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते एकाच मतदारसंघातून अनेकवेळी निवडून विधानसभेवर आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्यामुळे परळी विधानसभेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. २००९ साली गोपीनाथ मुंडे हे लोकसभेवर निवडून गेले. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणूक लढवली. दोन वेळा आमदार झाल्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला. धनंजय मुंडे आता अजित पवार गटात आहेत. पकंजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कांटे की टक्कर झाली. दोघांमधील संबंध काही काळ बिघडले होते. पण आता अजित पवार हे महायुतीत आल्याने त्यांच्यातील वितुष्टही संपले आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे पुन्हा एकदा याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. लोकसभेचं तिकीट दिल्याने त्यांना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्यासमोर पंकजा मुंडे यांचं आव्हान नसणार आहे. मागच्या निवडणुकीत बजरंग सोनावणे यांच्या ऐवजी राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांनी तिकीट दिले होते. धनंजय मुंडे यांनी ती निवडणूक जिंकवून दाखवली होती. पण आता ते अजित पवार गटात गेल्याने आणि बजरंग सोनावणे हे खासदार झाल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते.

परळी विधानसभेचा इतिहास

परळी विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. त्याआधी तो रेणापूर विधानसभा मतदारसंघात होता. ज्याची स्थापना १९७८ मध्ये झाली होती. तेव्हापासून या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवत होता. पण आता पहिल्यांदाच या ठिकाणी भाजपचा उमेदवार नसेल कारण या ठिकाणी महायुतीकडून धनंजय मुंडे हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. परळी हा मतदारसंघ आधी रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. पण नंतर लातूर ग्रामीणचा काही भाग जोडला गेल्यानंतर २००९ मध्ये याची नवीन रचना करण्यात आली. या मतदारसंघामुळे गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री घट्ट झाली. १९८० मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. १९८५ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. पंडित अण्णा दौंड यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून त्यांचा पराभव केला होता. या निवडणुकीनंतर १९९०, १९९५ , १९९९, २००४ पर्यत गोपीनाथ मुंडे या मतदारसंघातून सलग विजयी झाले. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी विजय मिळवला.

परळी विधानसभेतून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्याने धनंजय मुंडे नाराज झाले. त्यांनी भाजप सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये पंकजा मुंडे यांनी विजय मिळवला आणि त्या मंत्री देखील झाल्या. या दरम्यान धनंजय मुंडे यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवला आणि नगरपालिका, जिल्हा परिषद मध्ये बांधणी केली. त्यादरम्यान राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते केले. या संधीचे त्यांनी सोने केले.

 वर्ष विजयी उमेदवार पक्ष
२०१९ धनंजय मुंडे राष्ट्रवादी
२०१४ पंकजा मुंडे भाजप
२००९ पंकजा मुंडे भाजप

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत गेले. अजित पवार हे भाजपसोबत महायुतीत आल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष संपला. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी परळीतून ७४ हजार ८३४ मते पडली. पण तरी देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. फक्त साडे सहा हजार मतांनी पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला.

 लोकसभा निवडणूक निकाल 2024

 क्रं उमेदवार पक्ष मतं
बजरंग सोनवणे राष्ट्रवादी – पवार गट 683950
पंकजा मुंडे भाजप 677397
अशोक थोरात BHMP 54850

शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल?

शरद पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शरद पवारांनी चाचपणी सुरू केलीये. एक महिन्याआधीच राजाभाऊ फड यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राजेश फड हे परळीतील युवानेते आहेत. ते पंकजा मुडे यांचे निकटवर्तीय होते. सुदामती गुट्टे या ही शरद पवार गटात आल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यादेखील येथून इच्छूक आहेत. त्यामुळे या तिघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे फॅक्टर

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर सगळ्या जागा पाडणार असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेत पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. आता जर विधानसभा निवडणुकीतही ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष झाला तर वंजारी मतांमध्ये फूट पडू शकते. यांचा मोठा फटका धनंजय मुंडे यांना बसू शकतो.

 क्रं  उमेदवार पक्ष मतं
धनंजय मुंडे राष्ट्रवादी १,२२,११४
पंकजा मुंडे भाजप ९१,४१३
भीमराव सातपुते वंचित ४७१३

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र असल्याने या मतदारसंघात मुंडे यांची ताकद वाढली आहे. महायुतीकडून धनंजय मुंडे यांनाच तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांचं पारडं जड आहे. महायुतीचा इथे दुसरा कोणता उमेदवार इच्छूक नाही. त्यामुळे त्याचा ही फटका महायुतीला बसण्याची शक्यता नाही. महाविकासआघाडीच्या उमेदवाराला धनंजय मुंडे सारखा तगडा उमेदवाराला पाडण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

निवडून आलेले लोकप्रतिनिधी (रेणापूर विधानसभा मतदारसंघ) 1962 – गणपती आण्णा 1967 – ए.जी. गित्ते 1972 – रघूनाथ मुंडे 1978 – रघूनाथ मुंडे 1980 – गोपीनाथ मुंडे 1985 – पंडितराव दौंड 1990 – गोपीनाथ मुंडे 1995 – गोपीनाथ मुंडे 1999 – गोपीनाथ मुंडे 2004 – गोपीनाथ मुंडे (परळी विधानसभा मतदारसंघ) 2009 – पंकजा मुंडे 2014 – पंकजा मुंडे 2019 – धनंजय मुंडे

उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....