सलीम कुत्ता अन् बडगुजर यांच्या पार्टीतील सत्य समोर, तो व्हिडिओ…

sudhakar badgujar salim kutta case | मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीत नाचल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर चांगलेच अडचणीत आले आहेत. नाशिक पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बडगुजर यांची सलग सहा दिवस चौकशी केल्यानंतर आता सातव्या दिवशीही चौकशी होणार आहे.

सलीम कुत्ता अन् बडगुजर यांच्या पार्टीतील सत्य समोर, तो व्हिडिओ...
sudhakar badgujar kutta
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 12:14 PM

चंदन पुजाधिकारी, नाशिक, दि.21 डिसेंबर | मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता चर्चेत आला आहे. नितेश राणे याने सलीम कुत्ता आणि नाशिक ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यात झालेल्या पार्टीचा गौप्यस्फोट विधानसभेत केले. त्यानंतर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची कसून चौकशी नाशिक पोलिसांनी सुरु केली आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आता त्या व्हायरल व्हिडिओमधील सत्यही समोर आले आहे. पार्टीतील ‘त्या’ व्हडियोत दिसणारे फार्म हाऊस सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फार्म हाऊस सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकांचे

नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर याची सलग सहाव्या दिवशी चौकशी केली. या चौकशीत पार्टीतील ते फार्म हाऊस कोणाचे आहे? यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली. नाशिकमधील आडगाव परिसरातील हिंदुस्थानानगरमध्ये असलेल्या फार्म हाऊसमध्ये सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांची पार्टी झाली. हे फार्म हाऊस सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकांचे असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. यामुळे सुधाकर बडगुजर याच्या अडचणी वाढणार आहेत. पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांची तब्बल दोन तास चौकशी केली. त्या चौकशीत अनेक बाबी उघड झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

18 संशयितांची आता पर्यंत चौकशी

सुधाकर बडगुजर यांची बुधावारी सलग सहाव्या दिवशी चौकशी झाली. त्यानंतर गुरुवारी देखील चौकशी होणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 संशयितांची चौकशी करण्यात आली. आता नाशिक पोलीस घेणार सलीम कुत्ता याचा ताबा घेणार आहे. सलीम कुत्ताचा ताबा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. पोलीस आयुक्तालयाकडून कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या घरी पार्टी कुणी दिली? या ठिकाणी सलीम कुत्ता याला कोणी बोलवले? आदी प्रश्नांनी उत्तरे पोलीस सलीम कुत्ताकडून घेण्याची शक्यता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.