Pawar on Fadnavis : मी पुन्हा येईन म्हणणारे येऊ शकले नाहीत म्हणून अस्वस्थ; पवारांनी फडणवीसांना पुन्हा सुनावलं!
शरद पवार म्हणाले की, देशातल्या अनेक राज्यात विजेचे संकट आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्रमध्ये विजेची कमतरता आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक उष्णता जास्त. त्यामुळे विजेची मागणी वाढते. काही गोष्टींची कमतरता आहे. आता केंद्र सरकार काय म्हणतं, राज्य सरकार काय म्हणतं, यामध्ये मी पडू इच्छित नाही. सगळ्यांनी सोबत बसून मार्ग काढला पाहिजे.
मुंबईः कुठल्याही मैदानावर, कुठल्याही खेळाडूसमोर चौफेर फटकेबाजी करणारे व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar). होय, कारण आता राजकारणाचे क्षेत्र मैदानच झालंय. त्यात त्यांनी पुन्हा एकदा सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सुनावायची संधी सोडली नाही. पवार खास आपल्या शैलीत म्हणाले, हल्ली काही लोक फार अवस्थ आहेत आणि त्याला मी दोष देऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्याच्या पूर्वीच मी येणार, येणार…या प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या आणि ते घडू शकलं नाही. त्यामुळे ही अवस्थता असते, पण अपेक्षा करुया. आमच्या या स्नेह्यांना सुद्धा या परिस्थितीत काय परिणाम होतात हे लक्षात येईल आणि इथं योग्य वातावरण निर्माण करायला त्यांचंही सहकार्य लाभेल, असं आवाहन करून त्यांनी भाजपला (BJP) एक चिमटाही काढला. यावेळी पवार साऱ्या प्रश्नावरही बोलले.
संकटातून सर्वांनी मार्ग काढावा
शरद पवार म्हणाले की, देशातल्या अनेक राज्यात विजेचे संकट आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्रमध्ये विजेची कमतरता आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक उष्णता जास्त. त्यामुळे विजेची मागणी वाढते. काही गोष्टींची कमतरता आहे. आता केंद्र सरकार काय म्हणतं, राज्य सरकार काय म्हणतं, यामध्ये मी पडू इच्छित नाही. सगळ्यांनी सोबत बसून मार्ग काढला पाहिजे. आपले मुख्यमंत्री आपल्या वेळेपैकी बराच वेळ याला देत आहेत. त्यामुळे यावर मार्ग निघेल. यंदा पाऊस चांगला असं भाकीत वर्तवलं आहे. तसंच राहिलं तर हे फारकाळ राहणार नाही.
सभा संपली की एकत्र…
शरद पवार म्हणाले, एखाद्या धोरणासंबंधी, विचारासंबंधी प्रत्येकाला काही भावना असतात. त्या व्यक्तीने त्या भावना मनात ठेवाव्या. याचं प्रदर्शन करायला लागलो, तर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात व्यक्तिगत अशा गोष्टी होतात. मी राजकारणात काम केलं. बाळासाहेब आणि माझ्यात टोकाचे मतभेद होते. आम्ही जोमाने टीका केली, तरी आम्ही संध्याकाळी सोबत कधी ते माझ्या घरी कधी मी त्यांच्या घरी भेटायचो. बापूसाहेब काळदाते, भालेराव यांच्यासोबत आमची संध्याकाळ जायची. सभेत काय बोललो, यावर चर्चाही व्हायची नाही. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी यांच्यात टोकाची चर्चा ही असायची, तरी ती सभा संपल्यानंतर ते एकत्र बसायचे. इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!