PDCC Bank |पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद, मतदानानंतर काय म्हणाले अजित पवार?
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानानंतर अजित पवारांनी एक नेमकी प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केलीय. काय म्हणालेत अजित पवार?
पुणेः सर्व राज्याचे लक्ष असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक रंगलीय. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 21 पैकी 21 जागा होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर हवेली तालुक्यात एक मैत्रीपूर्ण लढत आहे. उर्वरित 6 जागांसाठी आज मतदान होत आहे. याच मतदानानंतर अजित पवारांनी एक नेमकी प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केलीय. काय म्हणालेत अजित पवार, घ्या जाणून.
दुर्दैवाने यश नाही…
पुणे जिल्हा बँकेच्या मतदानानंतर अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काही लोक वेगळा प्रचार करत आहेत. काही जागा मी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने आम्हाला यश आले नाही. आम्ही आमच्या परीने आमच्या विचाराचे लोक निवडूण आणण्याचा प्रयत्न करतोय. हवेली पुणे, पिंपरी चिंचवडनंतर विचार करायचा झाल्यास सर्वात जास्त मतदान बारामती येथे झाले आहे. बारामती येथे सातशे मते असल्याचे त्यांनी सांगितले.
जातीवादाचा आरोप
अजित पवार म्हणाले की, गेली तीस वर्षांपासून आम्ही बँक चांगल्या प्रकारे करत आहोत. यावेळी लोकांनी सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे. दोन महिला, क आणि ड वर्गात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत कोणी जातीवादाचा तर कोणी पाहुणे असल्याचा आरोप केला आहे. आम्ही पाच लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना देतो. जनरल निवडणुकीत सोपे जाते. मात्र, येथे मतदार कमी असल्यामुळे ही निवडणूक जिकरीची होते. काही प्रलोभने मिळाली तर अवघड होऊन जातं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दादांसाठी बँक प्रतिष्ठेची
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे. त्यामुळे या बँकेवरची सत्ता अजित पवारांसाठी अतिशय प्रतिष्ठेचीय. त्यामुळे त्यांनी इथे जोर लावलाय.
इतर बातम्याः