Petrol And Diesel Price | पेट्रोल, डिझेलची दरवाढ स्थिरावली, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
मागील काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Petrol Price) दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आता ही वाढ काहीसी स्थिरावली आहे. (petrol diesel price update)

मुंबई : मागील काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Petrol Price) दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आता ही वाढ काहीसी स्थिरावली आहे. आज (17 जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर ‘जैसे थे’ आहेत. (petrol and diesel price current update rate stabled)
मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात जागतिक पातळीवर घट झाली झाली होती. त्याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत होता. कच्च्या तेलाच्या निर्मितीमध्ये अव्वल क्रमांचा देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट केली होती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती. त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरावले आहेत.
इंडियन ऑईल या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेले नाहीत. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 84.70 रुपये प्रतिलीटर आहे. मुंबईत हा दर 91.32 रुपये प्रतिलीटर आहे. कोलकाता शहरात पेट्रोलचा दर 86.15 रुपये प्रतिलीटर तर चेन्नईमध्ये हा दर 87.40 रुपये प्रतिलीटर आहे. आज डिझेलच्या दरातही काही बदल झालेला नाही. दिल्ली शहरात डिझेलचा दर 74.88 रुपये प्रतिलीटर असून मुंबईमध्ये डिझेल 81.60 रुपये प्रतिलीटरप्रमाणे विकले जात आहे. कोलकाता शहरात डिझेलचा दर 78.47 रुपये तर चेन्नई मध्ये 80.19 रुपये प्रतिलीटर वर पोहोचला आहे.
देशातील प्रमुख शहरातील पेट्रोलचा दर
दिल्ली (Delhi Petrol Price Today): 84.70 रुपये प्रतिलीटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today): 91.32 रुपये प्रतिलीटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 86.15 रुपये प्रतिलीटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today): 87.40 रुपये प्रतिलीटर
नोएडा (Noida Petrol Price Today): 84.45 रुपये प्रतिलीटर
देशातील प्रमुख शहरातील डिझेलचा दर
दिल्ली (Delhi Diesel Price Today): 74.88 रुपये प्रतिलीटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today): 81.60 रुपये प्रतिलीटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 78.47 रुपये प्रतिलीटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today): 80.19 रुपये प्रतिलीटर
नोएडा (Noida Diesel Price Today) : 75.32 रुपये प्रतिलीटर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे दर
कोल्हापूर – 91.52 रुपये प्रतिलीटर
पुणे – पेट्रोल – 80.08 रुपये प्रतिलीटर
बीड – 92.37 रुपये प्रतिलीटर
परभणी – 93.73 रुपये प्रतिलीटर
औरंगाबाद – 92.55 रुपये प्रतिलीटर
नाशिक – 91.76 रुपये प्रतिलीटर
नागपूर – 91.82 रुपये प्रतिलीटर
संबंधित बातम्या :
Petrol And Diesel Price | 2 दिवसांपासून पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
(petrol and diesel price current update rate stabled)