मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत वाल्मिक कराड यांचा फोटो, संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले…

sanjay raut: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटोत असणारा खंडणीखोर, खुनी, गावगुंड (वाल्मिक कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल.

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत वाल्मिक कराड यांचा फोटो, संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले...
संजय राऊत यांनी शेअर केलेला फोटो
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 9:48 PM

Sanjay Raut: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येप्रकरणात सर्व आरोपींना अजून अटक झाली नाही. या हत्या प्रकरणात मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचे म्हटले जात आहे. परंतु गेल्या २२ दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसांना मिळत नाही. वाल्मिक करडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप केला जात आहे.

आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. खासदार राऊत यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर एक पोस्ट ट्विट केली आहे. त्यात वाल्मिक कराडसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री असणारा फोटो आहे. तो फोटो पोस्ट करुन संजय राऊत यांनी व्वा! क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटले?

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत वाल्मिक कराड याचा असलेला फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटोत असणारा खंडणीखोर, खुनी, गावगुंड (वाल्मिक कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल. हाय का नाही मोठा जोक? असे राऊत यांनी म्हटले आहे. या फोटोला त्यांनी क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका? असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोनंतर राज्यातील राजकारण तापणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. एसआयटी स्थापन केली आहे. सीआयडीकडे तपास दिला आहे. त्यानंतर वाल्मिक कराड सापडत नाही. त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी बीडमध्ये तर सोमवारी बुलढाण्यात मोर्चाही निघाला होता. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीयसुद्धा सहभागी झाले होते.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....