गणिताचं टेंशन चुटकी सरशी दूर होणार, गणिताच्या शिक्षकाचा फंडा ‘लई भारी’; संगीतमय फॉर्म्युले पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है !
शिक्षण घेत असतांना गणित विषय अनेकांचे टेंशन वाढवत असतो. असे असतांना पिंपरी चिंचवड येथील एका शिक्षकाने भन्नाट संकल्पना राबविली असून जोरदार चर्चा होत आहे.
पिंपरी चिंचवड : शिक्षण घेत असतांना काही मोजक्याच विद्यार्थ्यांचा गणित हा विषय आवडीचा असतो. पण बहुतांश विद्यार्थ्यांसाठी हा गणित विषय टेंशन वाढवणारा असतो. खरंतर गणिताचे विविध फॉर्म्युले असतात. ते लक्षात ठेवणं कठीण असतं. त्यासाठी विविध प्रकारे विद्यार्थी अभ्यास करत असतात. तर काही शिक्षण नवनवीन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना गणित विषय कसा सोपा होईल यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, अशी सर्व प्रयत्न करूनही गणित विषय विद्यार्थ्यांना अवघडच जातो. त्यासाठीच पिंपरी चिंचवड येथील अभिजित भांडारकर या गणिताच्या शिक्षकांनी भन्नाट कल्पना लावली आहे. जवळपास 20 प्रकारच्या संगीतांच्या माध्यमातून 1080 फॅाम्युले त्यांनी तयार केले आहे. त्याची मोठी चर्चा होत असून विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
गणित म्हटलं की अनेक विद्यार्थी घाबरून जातात पण पिंपरी चिंचवड मधल्या अभिजित भांडारकर या शिक्षकाने गणिताचे 1 हजार 80 फॅाम्युले संगीतमय पद्धतीने तयार केले आहेत. त्यांच्या या उपक्रमाची विक्रम म्हणून अनेक ठिकाणी नोंद करण्यात आली आहे.
अनोख्या पद्धतीने गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकाची सर्वत्र चर्चा होत आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या या उपक्रमाची नोंद झाली आहे तर नुकतेच त्यांची नोंद जागतिक वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना गणितात शून्य मार्क मिळत होते, त्यांनी वर्षभरात 82 मार्क मिळवण्याची किमया साधली आहे. पिंपरी चिंचवड मधल्या अभिजित भांडारकर या शिक्षकाने किचकट समजला जाणारा गणित विषय कसा सोपा करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे.
गणित विषयात अनेक जण नापास होतात. त्यामुळे गणिताची भीती अनेक विद्यार्थ्यांना असते. गणित विषयात नापास होऊ नये यासाठी विद्यार्थी विविध प्रकारे अभ्यास करत असतात. त्यासाठी अतिरिक्त क्लास देखील केले जातात. त्यात गणित विषयात पास आणि उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असतात.
हीच अडचण ओळखून अभिजीत भांडारकर या शिक्षकाने शोधून काढलेला पर्याय अनेक विद्यार्थ्यांना दिलासा देणारा वाटतो आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाण्यांचा आधार घेऊन तयार केलेले फॉर्म्युले विद्यार्थ्यांना आवडू लागले असून त्याचा फायदा देखील होत आहे.
त्यामुळे भांडारकर यांनी लढवलेली शक्कल विद्यार्थी वर्गात चर्चेचा विषय ठरत असून मोठा प्रतिसाद त्यांच्या या संकल्पनेला मिळत आहे. विद्यार्थ्यांना मोठा दिलासा यातून मिळणार आहे.