अजित पवारांना मोठा धक्का; 15 ते 20 नेते थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश करणार

Ajit Pawar Group Ex Corporator Inter in NCP Sharad Pawar : लोकसभा निवडणूक संपताच अजित पवार यांना मोठा धक्का... राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते शरद पवार गटाच्या वाटेवर... 15-20 नेते थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. वाचा सविस्तर बातमी...

अजित पवारांना मोठा धक्का; 15 ते 20 नेते थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश करणार
अजित पवार, शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 7:22 PM

नुकतंच लोकसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत हे नेते प्रवेश करणार आहेत. पिंपरी – चिंचवड अजित पवार गटाचे माजी नगरसेवकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पिंपरी – चिंचवडमधील 15 ते 20 नगरसेवक थोड्याच वेळात शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात हे पक्षप्रवेश होणार आहेत.

रोहित पवारांची प्रतिक्रिया

पिंपरी – चिंचवडमधील अजित पवार गटाचे 15 ते 20 माजी नगरसेवक थोड्याच वेळात राष्ट्रवादीत प्रवेश करतील. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक नेत्यांना शरद पवारसाहेबांच्या काम करायचं आहे. अजित पवार गटातील माजी नगरसेवक जयंत पाटलाच्या नेत्वृवात प्रवेश करणार आहे, असं रोहित पवार म्हणाले.

दहा दिवसात 35 लोकांचा प्रवेश करणार आहोत. शरद पवारसाहेबांनी मंत्री असताना पुणे आणि पिपंरी चिंचवडला दिलं गेलं. पिंपरी – चिंचवडमध्ये अख्या महाराष्ट्र वसला आहे. शरद पवारसाहेब , उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. आमच्याकडे येणारे गर्दी नाही तर दर्दी लोक आहेत, असं रोहित पवार म्हणाले.

गणेश कराड मास्टरमाईंट असल्याचं पाहिला मिळतं. कराड साध्या दुकानादारांकडून कमिशन घेतात असं मला कळालं. चुकीचे आहेत बबन गीतेवर कारवाई व्हायला पाहिजे. परळीतील दडपशाही त्यांना आवडत नाही. कराड नेत्यावर अडचण आलेली आहे. धनंजय मुंडे साहेबांचं परळीत काहीही चालत नाही. कराड या व्यक्तीचं परळीत सगळं चालतं. बुथ कँपचरिगं कसं चालतं हे आम्ही पाहिलेलं आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी बीडमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय.

“येत्या काळात आणखी पक्षप्रवेश होणार”

राज्यातील शिंदे सरकार हे सर्व फसवं सरकार आहे. मनसे अचानक का जागी का झालेली आहे? निवडणूक आली की ते जागे होतात. पिंपरी चिंचवड सगळ्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातही शरद पवारांची ताकद आणखी वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी बरेच नेते आमच्या पक्षात येणार आहेत, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.