पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा गुरुवारी संध्याकाळी बंद, तर शुक्रवारी विस्कळीत राहणार

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. तर शुक्रवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील.

पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा गुरुवारी संध्याकाळी बंद, तर शुक्रवारी विस्कळीत राहणार
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 9:11 PM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. तर शुक्रवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील असं पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. रावेत इथं अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिलीय. (Water supply in Pimpri Chinchwad will be cut off on Thursday evening)

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी संध्याकाही होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहितीही देण्यात आलीय. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय.

दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार

मावळमधील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत इथल्या बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी इथं पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत इथं अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची कामं केली जातात. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीचं काम हाती घेणं गरजेचं आहे. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे.

मान्सूनचा पाऊस वेशीवर दाखल

केरळमध्ये मान्सुन दाखल झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सुन दाखल होण्याची अनेक जण वाट पहायतायत. सध्या अरबी समुद्रात मान्सुन सक्रीय होण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या (Monsoon) आगमनाचे संकेत मिळतायत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी पहायला मिळतेय. तर मतलई वारे सुद्दा सध्या वेगाने वाहतायत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग हे मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत आहेत.

इतर बातम्या :

फडणवीसांचा महाराष्ट्र दौरा, शेतकऱ्यांची विचारपूस, कोरोना परिस्थितीचा आढावा आणि पक्षबांधणी; वाचा सविस्तर

45 वर्षावरील दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य, ठाणे पालिकेचा मोठा निर्णय

Water supply in Pimpri Chinchwad will be cut off on Thursday evening

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.