‘कमिशनसाठी कामं रोखली, मलाई खाल्ली’, पंतप्रधान मोदींची सर्वात पहिल्यांदा मविआवर इतकी टोकाची टीका

"इंडिया आघाडीवाले राज्यात वेगवेगळ्या क्लृपत्या लढवून सत्तेत आले तेव्हा त्यांनी फक्त स्वत:चा विकास केला. स्वत:च्या कुटुंबाचा विकास केला. कुणाचा किती वाटा असेल, कुणाला कोणतं कंत्राट मिळेल, मलाईदार पोस्ट कुणाच्या खात्यात आणि किती येणार या हिशोबातच यांनी पूर्ण महाराष्ट्राचं भविष्य गुरफटून टाकलं होतं", अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

'कमिशनसाठी कामं रोखली, मलाई खाल्ली', पंतप्रधान मोदींची सर्वात पहिल्यांदा मविआवर इतकी टोकाची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 6:05 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपुरात जाहीर सभा पार पडली. चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोली-चिमूरचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त कमिशन आणि मलाई खाण्याचं काम झालं, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अनेक विकासकामांना ब्रेक लावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचा विकास नाही तर स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबियांच्या विकासासाठी काम केलं, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

“लोकसभा 2024 ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता याच्यामधली निवडणूक आहे. एकीकडे भाजपप्रणित एनडीए आहे. या एनडीएचं ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की, जिथे सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खावी. इंडिया आघाडी नेहमी देशाला अस्थितरतेकडे नेलं आहे. एका स्थिर सरकारची आवश्यकता किती आहे हे महाराष्ट्राशिवाय कोण सांगू शकेल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘कमिशन आणा किंवा कामाला ब्रेक लावा असं मविआचं काम’

“इंडिया आघाडीवाले राज्यात वेगवेगळ्या क्लृपत्या लढवून सत्तेत आले तेव्हा त्यांनी फक्त स्वत:चा विकास केला. स्वत:च्या कुटुंबाचा विकास केला. कुणाचा किती वाटा असेल, कुणाला कोणतं कंत्राट मिळेल, मलाईदार पोस्ट कुणाच्या खात्यात आणि किती येणार या हिशोबातच यांनी पूर्ण महाराष्ट्राचं भविष्य गुरफटून टाकलं होतं. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित कोणताही प्रोजेक्ट पाहिल्यावर हे म्हणायचे की, कमिशन आणा किंवा कामाला ब्रेक लावा. या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. बळीराजा जलसिंजवनी योजना बंद केली. विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनासाठी योजना होती ती योजनाही त्यांनी ठप्प केली होती”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

“विदर्भाच्या विकासासाठी मी ज्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं त्यालाही या लोकांनी विरोध केला होता. या लोकांनी मराठवाड्याची सिंचन योजना बंद केलं. कोकणात रिफायनरी प्रोजेक्ट थांबवला, मुंबईत मेट्रो प्रकल्प रोखला होता, पीएम आवास योजनेसाठी केंद्रातून पैसे आल्यानंतरही त्यांनी गरिबांना घर देणं बंद केलं होतं. त्यांचं लक्ष एकच होतं, कमिशन आणा किंवा कामावर रोख लावा. आमच्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी या सर्व योजनांना सुरु केलं आहे. विकासाचं मोठं काम वेगाने पूर्ण होत आहे”, असा दावा नरेंद्र मोदींनी केला.

मोदींकडून नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“माता महाकालीच्या पावन भूमीत शक्तीला नमन करतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. उन्हाचा पारा वाढत आहे तसेच प्रचाराचा पाराही वाढताना दिसतोय. पण तुमच्या उत्साहात कोणतीही कमी बघायला मिळत नाही. यावर्षी चंद्रपुरानेही ठरवलं आहे की, पुन्हा एकदा मोदी सरकार, चंद्रपुराकडून एवढा मोठा स्नेह मिळणं माझ्यासाठी आणखी विशेष आहे. ही चंद्रपुरी आहे ज्याने अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी लाकूड पाठवलं. नव्या भारताच्या प्रती संसदेच्या नव्या इमारतीसाठीसुद्धा चंद्रपूरचं लाकूड लागलं आहे.चंद्रपूरची ख्याती पूर्ण देशात पोहोचली आहे. मी चंद्रपूरच्या नागरिकांना खूप शुभेच्छा देतो. उद्यापासून नववर्ष आणि नवरात्रीचा पावन पर्व सुरु होतोय. सर्व देशवासियांना या पर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. समस्त बंधुबघिणींना गुढीपाडवा आणि नूतन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा”, अशा शब्दांत मोदींनी चंद्रपूरच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.