‘हरियाणा पेक्षा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचाय’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार

"हरियाणामध्ये जिंकलो, आता महाराष्ट्रामध्ये जिंकायचं आहे", असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. "हरियाणा पेक्षा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचा आहे", असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

'हरियाणा पेक्षा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचाय', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार
नरेंद्र मोदी, पंतप्रधानImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 6:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील विविध विकासकामांचे उद्घाटन पार पडले. यामध्ये नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध कामांचं आणि शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन, तसेच नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उ‌द्घाटन यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोलाचा संदेश दिला. हरियाणात भाजपचा चांगला विजय मिळाला. पण महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे, असं नरेंद्र मोदी आजच्या कार्यक्रमात म्हणाले.

“हरियाणामध्ये जिंकलो, आता महाराष्ट्रामध्ये जिंकायचं आहे”, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. “हरियाणा पेक्षा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचा आहे”, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच “माझा पक्का विश्वास आहे, समाजाला तोडण्याचा आज जो प्रयत्न केला जातोय, अशा प्रत्येक षडयंत्राला महाराष्ट्राचे नागरीक हाणून पाडतील. महाराष्ट्राच्या नागरिकांना देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप आणि महायुतीसाठी मतदान करायचं आहे. हरियाणा तर भाजप जिंकली. आता महाराष्ट्रात या पेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यात वार-पलटवार

हरियाणाच्या निवडणुकीवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय युद्ध सुरु झालं आहे. “हरियाणामध्ये विकासावर लोकांनी मतदान केलं आहे. हरियाणात विकासनीती जिंकली आहे आणि महाराष्ट्रातदेखील विकासनीतीच्या जोरावर महायुती जिंकणार आहे. याची मला शंभर टक्के खात्री आणि विश्वास आहे. महाराष्ट्राची जनता विकासाच्या बाजूने उभी राहिली”, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “महाराष्ट्राची गोष्ट वेगळी आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, हे एकनाथ शिंदे यांनी विसरु नये. हरियाणात झालं ते हरियाणापुरतं, महाराष्ट्राची बात महाराष्ट्रात राहील. इथे तुन्ही काहीही करा, तुम्ही जिंकणार नाहीत”, असं संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं.

‘हरियाणासारखे निकाल महाराष्ट्रात लागणार’, रावसाहेब दानवे यांचा दावा

भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीदेखील हरियाणा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. “देशातील जनता मोदींवर विश्वास ठेवून आहे. मोदींच्या बाजूला सायलेंट वोटरचा एक वर्ग आहे. त्यामुळे हरियाणात पुन्हा भजपचे सरकार आलं आहे. हरियाणासारखे निकाल महाराष्ट्रात लागणार असून, भाजप आणि मित्र पक्ष पुन्हा महाराष्ट्रात सरकार बनवतील”, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केलाय. तसेच “जम्मू-काश्मीरला भाजपला मिळालेलं यश चांगलं आहे, त्यावर आम्ही नाराज नाही”, असंही दानवे म्हणाले आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.