दौरा पंतप्रधान मोदींचा, गुजगोष्टी फडणवीस-अजित दादांच्या अन् चर्चा राजकीय गोडव्याची!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याती चर्चा असो, की आणखी काही. महाराष्ट्राचे राजकारण इतरांपेक्षा वेगळे आणि एक पाऊल पुढे आहे. कोणी त्याला सुसंस्कृतपणा म्हणो की, कोणी आणखी काही. या गोडव्याची चर्चा तर होणारच.
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज पुणे (pune) दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) उद्घाटन केले. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आजी उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी त्यांच्याच बराच वेळ गुजगोष्टी रंगल्या. त्यांच्या या मैफलीची खुसखुशीत चर्चा सुरू झाली. बघा एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानांच्या मांडीला मांडी लावून कार्यक्रमात भाग घेतला. दुसरीकडे त्यांच्या या दौऱ्याला विरोध करत रोषही व्यक्त केला. हे फक्त आणि फक्त ‘राष्ट्रवादी’लाच जमू शकते, अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली. त्याला अनेक मागचे आणि पुढचेही संदर्भ होते. हे सांगायला कोण्या जाणत्या तज्ज्ञांची गरज नसावी.
त्याचे झाले असे की…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात मेट्रोच्या उदघाटनापासून ते अनेक कार्यक्रमांचा धडाका लावला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र, या दौऱ्यात व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांच्या गुजगोष्टी रंगल्या आणि अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
जुन्या आठवणींना उजाळा
व्यासपीठावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप नेते गिरीश बापट आदी मान्यवर उपस्थित होते. मोहोळ आणि बापट तर फडणवीस आणि अजित दादांच्या अगदी जवळ उभे होते. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये अशा काही चर्चा रंगल्या की, विचारूच नका. खरे तर अजित दादांनी केलेले बंड शरद पवारांनी हाणून पाडले आणि अगदी भल्या पहाटे त्यांनी घेतलेली शपथ आणि फडणवीसांचे मुख्यमंत्री होण्याचे मनसुबे सारे विरून गेले. त्यावेळी त्यांना अजित दादांनी भक्कपणे साथ दिली, पण ती निभावता आली नाही. आजच्या त्यांच्यातल्या गप्पा पाहून त्या आठवणींना आपसुकच उजाळा मिळाला. काहीही असो. महाराष्ट्राचे राजकारण इतरांपेक्षा वेगळे आणि एक पाऊल पुढे आहे. कोणी त्याला सुसंस्कृतपणा म्हणो की, कोणी आणखी काही. या गोडव्याची चर्चा होणारच.
इतर बातम्याः
नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे
Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?