पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील शेवटच्या प्रचारसभेत काय म्हणाले?

"विरोधक सावरकरांचा अपमान करतात, काश्मीरमध्ये कलम ३७० साठी प्रस्ताव समोर ठेवतात. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू करण्यास तिथे विरोध करतात. वार-पलटवार करणं समजतं. मात्र देशाच्या उपलब्धीसंदर्भात पक्षांचे कर्तव्य आहे की त्यांनी देशाला महत्त्व अधिक द्यावे", अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील शेवटच्या प्रचारसभेत काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 9:18 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीसाठीची शेवटची सभा आज रात्री मुंबईत पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गट आणि काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच त्यांनी मुंबईतील विविध विकासकामांविषयी माहिती दिली. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान असणार आहे. येत्या रविवारी 17 नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्याआधी मुंबईत आज मोदींची शेवटची सभा पार पडली. मोदींनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये प्रचारसभा घेतल्या. त्यानंतर त्यांची आज मुंबईत सांगता सभा पार पडली. या सभेत मोदी यांनी सविस्तर भूमिका मांडली.

“सिद्धिविनायक, मुंबादेवी आणि महालक्ष्मीच्या चरणी प्रणाम करतो. आज क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांची जयंती आहे. त्यांना देखील नमन. महाराष्ट्रातील निवडणुकीतील आजची माझी शेवटची सभा आहे. मी संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. मी आज आमच्या मुंबईत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे. आज एकच आवाज आहे, भाजप महायुती आहे तर गती आहे. तरंच महाराष्ट्राची प्रगती आहे. महाराष्ट्रातून चिंतनाची नवी धारा निघाली आहे. संतांनी दिशा दाखवली. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प घेतला. टिळकांनी देशभक्ती दाखवली”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘वार-पलटवार करणं समजतं मात्र…’

“दुसरीकडे एक विचार मविआचा देखील आहे जो राज्याच्या विचाराला अपमानित करत आहे. ते तुष्टीकरणाला बळी पडले आहेत. मतांसाठी भगवा दहशतवाद बोलतात. सावरकरांचा अपमान करतात, काश्मीरमध्ये कलम ३७० साठी प्रस्ताव समोर ठेवतात. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू करण्यास तिथे विरोध करतात. वार-पलटवार करणं समजतं. मात्र देशाच्या उपलब्धीसंदर्भात पक्षांचे कर्तव्य आहे की त्यांनी देशाला महत्त्व अधिक द्यावे”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

हे सुद्धा वाचा

मोदींची काँग्रेसवर खोचक टीका

“मुंबई बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्वाभिमानाचे शहर आहे. मात्र एक पक्ष मविआत आहे ज्याने काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. काँग्रेसच्या शहजादांकडून बाळासाहेबांचे गौरवोद्गार काढायला सांगा. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणायला लावा. तुम्हाला झोप येईल, कधी दवाखान्यात जावं लागणार नाही. सावरकरांना शिव्या देणाऱ्यांच्या गळ्यात गळे टाकत फिरत आहेत”, अशी खोचक टीका मोदींनी ठाकरे गटावर केली.

‘…तर मोदी पाताळात देखील सोडणार नाही’

“दहशतवादाला अजूनही लोकं विसरले नव्हते. मात्र मागील काही वर्षात लोकांमध्ये सुरक्षेचा भाव आला आहे. आधीचे सरकार वेगळे होते. मात्र आज मोदी आहे. काँग्रेस असताना देशात दहशतवादी घटना होत होत्या. मात्र आता ते बंद झालंय. आज देशात मोदींचं सरकार आहे. आंतकवाद्यांना माहिती आहे. भारताविरोधात आणि मुंबई विरोधात काही केलं तर मोदी पाताळात देखील सोडणार नाही”, असा घणाघात मोदींनी केला.

मोदी आणखी काय-काय म्हणाले?

“महायुतीचा मंत्र आहे, प्रवृत्ती देखील आमची आहे. मविआसाठी देशापेक्षा पक्ष मोठा आहे. भारताच्या उपलब्धीवर प्रश्न उपस्थित करतात. दशकांपासून मराठीला अभिजात दर्जा मिळवून दिला नाही. मविआच्या राजकारणापासून आणि त्यांच्यापासून सावधान राहायचे आहे. महायुती स्वप्नांना पूर्ण करणारे बंधन आहे. मध्यमवर्ग ज्याने दशकांपासून स्वप्न नाही बघितले त्याचे स्वप्न पूर्ण होत आहेत. आम्ही स्टार्टअप इंडिया सुरु केला, मुंबईत मोठ्या प्रमाणात स्टार्टअप येत आहेत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“मध्यम वर्गीयांना गृहकर्ज मिळत आहे. ते भविष्याबद्दल निश्चिंत आहेत. ७० लाख रेडीपटरी वाल्यांना आपला व्यापार वाढायला मदत मिळाली आहे. मुंबईत आमच्या १ लाख पेक्षा अधिक रेडीपटरीवाल्यांना रोजगार मिळाला आहे. सेवाभावानाने भाजप आणि महायुतीच काम करु शकते”, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

“मी नम्रतापूर्वक सांगतो आपल्याला जबाबदारीने सांगतो. आपले स्वप्न आमचे संकल्प आहेत, मोदी आपल्या स्वप्नांना जगतो आणि पूर्ण करण्यासाठी मेहनत करत गॅरंटी देतो. सर्व देश आधुनिक बनवण्यासाठी लागले आहेत. भाजप आणि महायुतीने देखील हेच स्वप्न मुंबईसाठी बघितले आहे. विकास कामांना आपण गती देतोय. कनेक्टिविटीच्या त्रासातून आम्ही मुक्ती मिळवून देऊ इच्छितो”, असा दावा मोदींनी केला आहे.

“लाखो कोटी रुपयांचं काम मुंबईत सुरु आहे. महामार्ग, मेट्रो, विमानतळ वेगाने कामं होत आहेत. देशात काँग्रेसचं सरकार राहीलं. मात्र मुंबईला घेऊन फॉरवर्ड प्लानिंग केलं नाही. मुंबई त्यामुळे मागे गेली. मुंबईचा स्वभाव आहे इमानदारी आणि मेहनत. मात्र काँग्रेसने भ्रष्टाचार, अडथळे आणणे हे काम केलं. अटल सेतू, मेट्रोचा विरोध हे करत होते”, अशी टीका मोदींनी केली.

“डिजीटल इंडिया आणि युपीआयचं बोलत होतो तेव्हा मस्करी उडवत होते. ही लोकं मुंबईला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. आम्ही जोडायला पुढे येतो. मात्र मविआ तोडायची भाषा करते. मुंबई अनेक भाषांची लोकं येतात. मात्र मविआ भांडणं लावते”, असा आरोप मोदींनी केला.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.