11,108 कोटींचा प्रकल्प, ज्या पालखी मार्गांचं नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, त्याचं स्वरुप काय?
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी 3.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोदी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावतील. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी 3.30 वाजता पार पाडणार आहे. या कार्यक्रमासाठी मोदी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावतील. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. हे दोन्ही मार्गांच्या उभारणीसाठी 11108 कोटी रुपयांचा खर्च लागणार असून यामुळे दळणवळण अगदीच सोपे होणार आहे.
मोदी भूमीपूज करणार तो मार्ग कसा आहे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग अशा दोन रस्ते प्रकल्पाचा भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहतील. मोदी या दोन्ही मार्गांच्या चौपदरीकरणाची पायाभरणी करतील. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांना जाण्यासाठी पतपथ बांधला जाणार आहे.
11,108 करोड़ रुपए की कुल लागत से बन रहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज और श्री संत तुकाराम महाराज पालकी मार्ग से वारकरी भक्तगणों की यात्रा सुविधाजनक, सुरक्षित और सुगम होगी। #PragatiKaHighway @narendramodi @nitin_gadkari pic.twitter.com/yjhzpFr1w9
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) November 7, 2021
दोन्ही मार्ग कोठून कुठपर्यंत जाणार
संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग हा पंढरपूर ते आळंदी असा असेल. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग देहू ते पंढरपूर असा असणार आहे. या दोन्ही मार्गांना अगदी प्रशस्त बनवले जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण केले जाणार आहे .तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (NH-965G) तीन विभागाचे चौपदरीकरण होणार आहे.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी महाराष्ट्र और पंढरपुरवासियों को दे रहे नई सौगात। 8 नवंबर, सोमवार को पालकी मार्ग परियोजनाओं के शिलान्यास के साथ अन्य राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं का होगा लोकार्पण। #PragatiKaHighway pic.twitter.com/OwRb2Estcd
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 7, 2021
नेमका खर्च किती लागणार ?
नितीन गडकरी यांचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिवेघाट ते मोहोळ अशा सुमारे 221 किलोमीटरचे चौपदरीकरण केले जाईल. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पाटत ते तोंडळे-बोंडाळे असा सुमारे 130 किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात येईल. या दोन्ही मार्गावर वारकऱ्यांसाठी पदपथ उभारला जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी अनुक्रमे 6 हजार 690 कोटी आणि 4 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे.
Pandharpur has a special place in the hearts and minds of many. The Temple there draws people from all sections of society, from all over India. At 3:30 PM tomorrow, 8th November, I will join a programme relating to upgrading Pandharpur’s infra needs. https://t.co/IUCE0L3dZT
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2021
पंढरपूरला जोडणाऱ्या अन्य महामार्गांचे लोकार्पण
दरम्यान, भूमिपूजन समारोहावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूरला जोडणाऱ्या 223 किलोमीटरपेक्षा अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्पाचं लोकार्पण करतील. त्याची अंदाजे किंमत 1 हजार 180 कोटी रुपये असणार आहे. यात म्हसवड-पिलिव-पंढरपूर (NH-548E), कुर्डूवाडी-पंढरपूर (NH-965C), पंढरपूर-सांगोला (NH-965C), त्याचबरोबर NH-561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि पंढरपूर-मंगळवेळा-उमदी विभागाचा समावेश असेल.
इतर बातम्या :
कुत्री मरते तरी दिल्लीचे नेते शोक करतात, राज्यपाल मलिक यांच्या टार्गेटवर पुन्हा मोदी सरकार
आंदोलनाची तीव्रता वाढली ! कोल्हापुरातील एसटी कर्मचारी सोमवारपासून संपावर