Narendra Modi : कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांशी पंतप्रधान मोदींचा संवाद, रायगडमधील 26 मुलांचाही समावेश

प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन (PM care For Children) योजने अंतर्गत आयोजित या संवाद कार्यक्रमात रायगडमधील बालकांनीही सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील 26 अनाथ बालकांनी यात सहभाग घेतला होता.

Narendra Modi : कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांशी पंतप्रधान मोदींचा संवाद, रायगडमधील 26 मुलांचाही समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 4:03 PM

रायगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज कोरोना काळात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुलांशी संवाद साधला. 30 मे रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा ऑनलाईन संवाद पार पडला. प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन (PM care For Children) योजने अंतर्गत आयोजित या संवाद कार्यक्रमात रायगडमधील बालकांनीही सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील 26 अनाथ बालकांना पंतप्रधान मोदींचे पत्र, पीएम केअर योजनेचे स्नेह प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत विमा योजनेचे (Ayushman Bharat Insurance Scheme) कार्ड, पोस्ट खात्याचे पासबुक अशा विविध लाभाचे वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

कोरोना काळात आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड निधीतून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. या मुलांना वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेतून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमान दिला जाणार आहे. त्याचा प्रीमियमही पीएम केअर फंडातून भरला जाईल. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह स्नेह प्रमाणपत्रही देण्यात आलं.

नागपुरातील 79 अनाथ मुलांशी पंतप्रधानांचा संवाद

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनाथ बालकांना मोफत शिक्षण तसंच 15 लाखाच्या पॅकेजचं वितरण करण्यात आलं. केंद्र आणि राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी अनाथ मुलांसोबत संवाद साधला. तसंच पंतप्रधान मोदी यांनी मुलांची विचारपूसही केली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.