Prashant Koratkar वरुन वकिलांमध्ये कोर्टात काय युक्तीवाद सुरु आहे, तो 5 पॉइंटमधून समजून घ्या
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. त्याची कोठडी मिळवण्यासाठी काय युक्तीवाद सुरु आहे, तो पाच पॉइंटमधून समजून घ्या.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला काल तेलंगणमध्ये अटक करण्यात आली. आज सकाळी त्याला कोल्हापूरला आणण्यात आलं. जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. आता त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. त्याची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी कोर्टात युक्तीवाद सुरु आहे. आरोपीचे वकिल आणि पोलिसांकडून कोर्टात काय युक्तीवाद सुरु आहे, तो पाच पॉइंटमधून समजून घ्या.
प्रशांत कोरटकरला अटक करण्याची गरज नव्हती असा युक्तीवाद आरोपीचे वकील सतिश घाग यांनी कोर्टात केला.
प्रशांत कोरटकरवर लावलेल्या कलमानुसार त्याच्या अटकेची गरज नव्हती, असं त्याच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं.
राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवले हा गंभीर गुन्हा आहे, असं वकील असिम सरोदे म्हणाले.
प्रशांत कोरटकरची विधानं गंभीर आहेत. त्यामुळे त्याचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहे, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
आरोपी महिन्याभरापासून फरार होता. त्यामुळे त्याची चौकशी करायची आहे. म्हणून त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती पोलिसांनी कोर्टात केली.
प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले. कोरटकरने डाटा डिलीट केला, त्याचा तपास करायचा आहे, असं पोलिसांनी कोर्टात युक्तीवाद करताना सांगितलं.