संभाजी भिडे यांना धक्क्यावर धक्के, चिपळूणमधून मोठी बातमी समोर

संभाजी भिडे यांच्याबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भिडे हे सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती समोर आली. असं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

संभाजी भिडे यांना धक्क्यावर धक्के, चिपळूणमधून मोठी बातमी समोर
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 12:05 AM

चिपळूण | 2 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना धक्का देणारी मोठी बातमी चिपळूण येथून समोर आली आहे. संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला नुकतंच औरंगाबाद येथे परवानगी नाकारण्यात आल्याची बातमी ताजी असताना आता चिपळूण येथूनही तशीच बातमी समोर आली आहे. संभाजी भिडे यांच्या चिपळूण येथील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. संभाजी भिडे हे उद्या 3 ऑगस्टला चिपळूणला जाणार होते. ते नियोजित कार्यक्रमासाठी चिपळूणला जाणार होते. पण त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने चिपळूणमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संभाजी भिडे उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडे परवानगी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र प्रशासनाने संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या विविध घडामोडींमुळे संभाजी भिडे यांची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झालाय. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडे यांना जिथे असतील तिथून उचला आणि तुरुंगात टाका, अशी मागणी केली आहे. तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांनीदेखील संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विधानसभेतील आज वातावरण चांगलंच तापलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडूनही वारंवार संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या या मागणीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. संभाजी भिडे यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं.

औरंगाबाद पोलिसांनीही परवानगी नाकारलेली

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला नुकतंच औरंगाबाद येथे देखील परवानगी नाकारण्यात आली होती. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांनी संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. कारण भिडे यांच्या कार्यक्रमाआधी अनेक संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. भिडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वातावरण तापलेलंं आहे त्यामुळे पोलिसांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.